Eco friendly bappa Competition
घर ट्रेंडिंग विशाखापट्टणम वायू गळती: काय आहे नेमका स्टायरिन गॅस?

विशाखापट्टणम वायू गळती: काय आहे नेमका स्टायरिन गॅस?

Subscribe

विशाखापट्टणममधील एलजी पॉलिमर कारखान्यात गॅस गळतीने ११ जणांचा मृत्यू झाला आहे. स्टायरीन गॅस गळतीमुळे अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये गुरुवारी गॅस गळतीमुळे मोठी दुर्घटना घडली. गुरुवारी पहाटे विशाखापटणममधील वायू गळतीमुळे आतापर्यंत ११ जणांचा बळी गेला आहे आणि ३०० हून अधिक जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृत्यूंची संख्या आणखी वाढू शकते. एनडीआरएफचे महासंचालकांच्या म्हणण्यानुसार विशाखापट्टणममधील घटना स्टायरीन गॅस गळतीमुळे घडली आहे. हे रंगहीन द्रवा सारखं आहे. तथापि, त्याचे काही नमुने पिवळे देखील असतात.

कारखान्याच्या ३ किमीच्या परिघात एक हजाराहून अधिक लोक आजारी पडले आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, त्यांनी अनेक लोकांना जमिनीवर पडताना पाहिलं. गॅस गळती बंद केली असल्याचे पोलिसांनी सांगितलं. एनडीआरएफची टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली. या गॅस गळतीचा परिणाम १ ते १.५ किमीपेक्षा जास्त होता. पण वायूचा वास २ ते २.५ किमीपर्यंत जाणवला.

स्टायरिन गॅस किती धोकादायक आहे?

- Advertisement -

प्लास्टिक, पेंट, टायर यासारख्या वस्तू बनवताना स्टायरिन गॅसचा वापर केला जातो. या वायूचा मनुष्यावर वाईट परिणाम होतो. जर हा वायू शरीरात शिरला तर डोळ्यांमध्ये जळजळ, श्वासोच्छवास, बेशुद्धी आणि उलट्यांचा त्रास होऊ लागतो. या वायूचा मानवाच्या मज्जासंस्थेवरही परिणाम होतो. या वायूने पाहण्याची आणि ऐकण्याची क्षमता देखील जाऊ शकते. स्टायरिन गॅस हा रंगविरहीत किंवा हलकासा पिवळ्या रंगाचा असतो. हा एक ज्वलनशील पदार्थ असून त्याचा गोड वास येतो. या गॅसला स्टिरॉल किंवा विनिल बेन्झिन म्हणूनही ओळखलं जातं. बेन्झिन आणि इथिलिनपासून या वायूची कारखान्यांसाठी निर्मिती केली जाते. कंटेनर, पॅकेजिंग, सिंथेटिक मार्बल, फ्लोअरिंग, तसंच टेबलवेअर आणि मोल्डेड फर्निचरमध्ये वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक आणि रबराच्या निर्मितीसाठी याचा वापर होतो.


हेही वाचा – विशाखापट्टणममध्ये पुन्हा गॅस गळती; ११ जणांचा मृत्यू


- Advertisement -

जेव्हा हा वायू फुफ्फुसात जातो तेव्हा फुफ्फुसाच्या कामात अडथळे निर्माण होतात. यामुळे श्वास घेण्यास अडचण आल्यामुळे व्यक्तीचा मृत्यू होतो. या वायूचा परिणाम पीडितांच्या प्रजनन क्षमतेवर आणि शारीरिक विकासावर होतो. एवढेच नव्हे तर यामुळे रक्त आणि त्वचेचा कर्करोग देखील होतो.

 

- Advertisment -