घरदेश-विदेशभक्तांवरील अमानुष आणि गुंडशाही मारहाणीचा विश्व हिंदू परिषदेकडून निषेध

भक्तांवरील अमानुष आणि गुंडशाही मारहाणीचा विश्व हिंदू परिषदेकडून निषेध

Subscribe

मंदिरात जाणाऱ्या भक्तांवर केरळ पोलिसांकडून क्रूर आणि गुंडशाही केली जात असून या मारहाणीचा विश्व हिंदू परिषदेकडून निषेध केला जात आहे.

शबरीमला देवस्थानात सर्व वयोगटाच्या महिलांना प्रवेश देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निर्णयानंतर मोठ्या संख्येने वाद निर्माण झाला आहे. मंदिरात जाणाऱ्या भक्तांवर केरळ पोलिसांकडून क्रूर आणि गुंडशाही केली जात आहे. हे पोलीस मार्क्सवादी गुंडे खाकी वेषात हिंदूच्या आस्थेवर प्रहार करण्यासाठी आले आहेत. शांततापूर्ण पद्धतीने सत्संग करणाऱ्या भक्तांवर सीपीएम सरकारकडून हे अत्याचार करण्यात आला आहे, अशा शब्दांत विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री डॉ सुरेंद्र कुमार जैन यांनी निंदा केली आहे.

राज्यव्यापी बंदचे आवाहन

विजयन परिसरातील पोलिसांनी केवळ लाठीमार आणि दगडफेकच केली नाही तर भक्तांच्या गाड्यांची तोडफोड करून त्यांच्या सामानाचीही लूट केली आहे. प्रशासनाकडून केलेल्या सर्व दंडेलशाही नंतरही ते भक्तांची आस्था पायदळी तुडवू शकले नाहीत. आस्थेचा विजय झाला आणि हुकूमशाहीचा पराजय झाला आहे. हिंदूंच्या आस्था नेहमीच पायदळी तुडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सीपीएम सरकारने कलम १४४ लागू करून हिंदूंच्या आस्थांची थट्टा उडवणाऱ्या काही महिलांनी मंदिरात जबरदस्तीने प्रवेश करण्याचे षडयंत्र केले. तेव्हा त्यांचे षडयंत्र सफल होणार नाही, असा इशारा डॉ. जैन यांनी दिला आहे. सरकारी आणि षडयंत्राच्या विरोधात शबरीमाला कर्म समितीने आज १२ तासांचा राज्यव्यापी बंदचे आवाहन केले आहे. याला सर्व सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी समर्थन दिले आहे.

- Advertisement -

शबरीमालामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यासाठी केवळ सीपीएम सरकार आणि त्यांच्याद्वारे पोसल्या जाणाऱ्या हिंदूविरोधी काही मानवाधिकारवादीच जबाबदार आहेत. महिलांना अधिकार देण्याच्या निमित्ताने हे लोक वास्तवात हिंदूच्या आस्था पायदळी तुडवण्याचा प्रयत्न करत आले आहेत. या लोकांनीच पाद्रीद्वारा बलात्कार पीडित ननबाबत आवाज उठवला नाही. परंतु ननला वेश्या म्हणण्याचे साहस केले असून मुस्लिम महिलांना मस्जिदमध्ये प्रवेशाबाबत त्यांच्या तरुणांनी मौन धारण केले आहे. सरकारने आपली चूक स्वीकार करून पुनर्विचार याचिका दाखल केली पाहिजे.  – डॉ सुरेंद्र जैन, विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -