घरदेश-विदेशविहिंपचे ज्येष्ठ नेते रमेश मोदी यांचे निधन; मुंबईच्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

विहिंपचे ज्येष्ठ नेते रमेश मोदी यांचे निधन; मुंबईच्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Subscribe

मुंबई : विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) राष्ट्रीय कोषाध्यक्ष रमेश मोदी यांचे निधन झाले आहे. रमेश मोदी यांचे मंगळवारी (14 नोव्हेंबर) मुंबईतील नानावटी रुग्णालयात निधन झाले. रमेश मोदी यांनी वयाच्या 83 वर्षी अखेरचा श्वास घेतला दिल्लीतील विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी रमेश मोदी यांच्या निधनाची बातमी ट्वीटवरून दिली.

विनोद बन्सल यांनी ट्वीट करत माहिती दिली की, रमेश मोदी यांच्या निधनाने हिंदू समाज आणि विश्व हिंदू परिषदेची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील आदिवासी समाजाला श्री रामजन्मभूमी आंदोलनाशी जोडण्यात त्यांनी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा 56 इंच छातीचा नेता राहुल गांधींना घाबरतो – संजय राऊत

रमेश मोदी यांचे पार्थिव रायपूर येथे आणण्यात येणार असून आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. रमेश मोदी हे कापड व्यावसायिक होते. रायपूरमध्ये विहिंप कार्यालयाच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रमेश मोदी दीर्घकाळापासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -