घरदेश-विदेश'The Kerala Story' वादात विवेक अग्निहोत्री यांची उडी; थरूर यांना दिले चोख प्रत्युत्तर

‘The Kerala Story’ वादात विवेक अग्निहोत्री यांची उडी; थरूर यांना दिले चोख प्रत्युत्तर

Subscribe

नवी दिल्ली : निर्माते विपुल अमृतलाल शाह यांच्या ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाल्यानंतर वादाला सुरूवात झाली आहे. ट्रेलर संदर्भात काँग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांनीही महिलांचे धर्मांतर होत असल्याचे पुरावे देण्यासाठी आव्हान केले आहे. त्यांना ‘द कश्मीर फाइल्स’च्या दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाल्यानंतर केरळ सरकारने या चित्रपटाला आरएसएस आणि भाजपाचा विधानसभा निवडणुकीसाठी प्रोपगंडा असल्याचे म्हटले आहे. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी या चित्रपटाला विरोध केला आहे. त्यांनी असेही म्हटले की, हा भाजपाचा अजेंडा आहे. प्रकरण कोर्टातही पोहोचले.

- Advertisement -

विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, कोणत्याही चित्रपटाला पाहण्यापूर्वी वाईट म्हणणे योग्य नाही. ते म्हणाले की, जर तुम्ही चित्रपट न पाहता त्यावर हल्ला केला तर तुम्ही प्रामाणिक आणि निष्पक्ष व्यक्ती नाही किंवा लोकशाहीवादी आणि मुक्त बोलणारे व्यक्ती नाही.

दरम्यान, काँग्रेस नेते शशी थरूर यांनीही ‘द केरळ स्टोरी’ ट्रेलर प्रकरणी ट्वीट केले आहे. त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करून प्रतिक्रिया दिली आणि चित्रपटाची कथा चुकीची असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, “केरळमधील ३२,००० महिलांच्या कथित धर्मांतराचा प्रचार करणाऱ्या सर्वांसाठी एक संधी, दावा सिंद्ध करा किंवा पैसा कमवा. आव्हान स्वीकारण्यास तयार होणार नाही कारण कोणतेही पुरावे अस्तित्वातच नाहीत? याबरोबरच थरूर यांनी एक पोस्टही शेअर केली आहे. यामध्ये ‘केरळमधील ३२००० महिलांनी इस्लामीकरणाचे समर्थन करणाऱ्या सर्वांसाठी ही एक चांगली संधी आहे – ते सिद्ध करा आणि पैसे कमवा. हे आव्हान तुम्हाला मदत करेल का? कोणीतरी ते स्वीकारेल किंवा काही नाही पुरावा कारण असे कधीच घडले नाही. ही आपल्या केरळची कथा नाही.

- Advertisement -

यावेळी त्यांनी ‘नॉट अ केरळ स्टोरी’ असा हॅशटॅगही वापरला आहे. त्यांच्या या पोस्टनुसार, ज्यांना आव्हान स्वीकारून एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळवायचे आहे, त्यांनी दोन दिवसांनी म्हणजे ४ मे रोजी केरळमधील प्रत्येक जिल्ह्यातील काउंटरवर पुरावे सादर करावे. आता चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी फक्त तीन दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत चित्रपटाचे प्रदर्शन थांबविण्याची मागणी होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -