घरताज्या घडामोडीIndia-Russia summit: भारत व रशिया दहशतवादाविरोधात एकत्र लढणार, व्लादिमीर पुतिन यांचा इशारा

India-Russia summit: भारत व रशिया दहशतवादाविरोधात एकत्र लढणार, व्लादिमीर पुतिन यांचा इशारा

Subscribe

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आज भारत दौऱ्यावर आले आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची नवी दिल्लीमध्ये भेट घेतली आहे. तसेच दोन्ही नेते २१ वी वार्षिक भारत-रशिया शिखर परिषद घेणार आहेत. दरम्यान, कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि आव्हाने असूनही भारत-रशिया संबंधांच्या वाढीच्या गतीमध्ये कोणताही बदल झालेला नाहीये. असं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. परंतु आता व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली आहे. मात्र, नरेंद्र मोदी व व्लादिमीर पुतिन यांच्यात हैदराबाद हाऊसमध्ये बैठक सुरू असून दहशतवादीच्या विरोधात एकत्र लढणार असल्याचं व्लादिमीर पुतीन यांनी सांगितलं आहे.

नरेंद्र मोदी व व्लादिमीर पुतिन यांच्यात हैदराबाद हाऊसमध्ये बैठक सुरू आहे. दहशतवादीच्या विरोधात एकत्र लढणार असल्याचं व्लादिमीर पुतीन यांनी सांगितलं आहे. तसेच महासत्ता असा उल्लेख देखील करण्यात आला आहे. भारत आमचा सर्वात विश्वासू मित्र आहे. असं देखील पुतीन यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व व्लादिमीर पुतीन यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. यामध्ये भारत आमचा सर्वात विश्वासू देश आहे. तसेच भारत व रशिया दहशतवादाविरोधात एकत्र लढणार असल्याचा सूचक इशारा पुतीन यांनी पाकिस्तानला दिला आहे.

- Advertisement -

भारत आणि चीन सीमा वादावर रशिया भारताच्या बाजूने असल्याची माहिती व्लादिमीर पुतीन यांनी दिली आहे. तसेच भारत-रशियाच्या मित्रत्वाचे २० वर्ष पूर्ण झाले आहेत. भारतामध्ये येऊन मला खूप आनंद झाला. कोरोना विरोधातल्या लढयात भारत आणि रशिया ही दोन्ही राष्ट्र एकत्र असल्याचं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

भारत आणि रशिया यांच्यातील संबंध अधिक प्रमाणात दृढ होणार आहेत. व्लादिमीर पुतीन व पीएम मोदी यांच्या भेटीमुळे काही महत्त्वाचे करार देखील होणार आहेत. यामध्ये देशाच्या सैनिकांना एक नवं शास्त्र मिळणार आहे. एके-२०३ असॉल्ट रायफल ही नवी बंदुक भारतीय सैनिकांना मिळणार आहे. त्यामुळे भारत व रशिया यांच्यात हा करार झाला असून ५ लाख एके-२०३ रायफल्स तयार करणार आहेत. मेक इन इंडियाच्या नियंत्रणाखाली उत्तर प्रदेशच्या अमेठी येथे ही निर्मिती केली जाणार आहे. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व रशियाच्या रशियाच्या सुर्गेई शोईगु यांनी करारावर सह्या देखील केल्या आहेत. त्यामुळे एके-२०३ रायफलला एक रायफल, श्रेष्ठ रायफल अशी टॅगलाईन देण्यात आली आहे.

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -