घरताज्या घडामोडीCoronaVirus: रशियाच्या पंतप्रधानांनंतर राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे प्रवक्ते कोरोना पॉझिटिव्ह

CoronaVirus: रशियाच्या पंतप्रधानांनंतर राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे प्रवक्ते कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

रशियातील कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढताना दिसत आहे. दरम्यान रशियाच्या पंतप्रधानांनंतर राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे प्रवक्ते डिमिट्री पेस्कोव्ह यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला असल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात असोसिएटेड प्रेसने वृत्त दिलं आहे. पेस्कोव्ह यांनी स्वतः रशियातील प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे की, ‘मी आजरी आहे आणि माझ्यावर उपचार सुरू आहेत.’

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे डिमिट्री पेस्कोव्ह हे २००० पासून प्रवक्ते आहेत. ते त्यांच्या अत्यंत जवळचे आणि खास मानले जातात. सध्या पेस्कोव्ह यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रशियाचे पेस्कोव्हे हे चौथे वरिष्ठ सरकारी अधिकारी आहेत ज्यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे.

- Advertisement -

यापूर्वी रशियाचे पंतप्रधान मिखाइल मिशुस्तिन, सांस्कृतिक मंत्री ओल्गा ल्युबिमोव्हा आणि बांधकाम मंत्री व्लादिमिर याकुशेव हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. अजून या तिघांची प्रकृती स्थिर झालेली नाही आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.

- Advertisement -

रशियात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोबाधितांच्या यादी आता रशिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत रशियामध्ये २ लाख ३२ हजार २४३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २ हजार ११६ जणांचा मृत्यू झाला आहे.  जगातील कोरोबाधितांचा आकडा हा ४३ लाखांवर पोहोचला आहे. तर जगात कोरोनामुळे २ लाख ८९ हजारहून अधिक जणांना मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – CoronaVirus:…म्हणून जगातील सर्वात मोठ्या इमारतीवर १२ लाख पेटवल्या लाईट्स!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -