आता कुठूनही करता येणार मतदान, ECची नवी योजना

रिमोट वोटींग प्रोजेक्ट असे या योजनेचे नाव आहे.

Voting can now be done from any polling station , EC's new scheme
आता कुठूनही करता येणार मतदान, ECची नवी योजना

मतदान करणे हा सर्वसामान्य नागरिकांचा मुलभूत अधिकार आहे. मात्र कामानिमित्त किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे लोक आपल्या घरापासून दूर स्थायिक होतात. निवडणूकींच्या काळात मतदान करण्यासाठी मात्र या लोकांना आपल्या घरी यावे लागते. मात्र या लोकांना मतदान करण्यासाठी पुन्हा घरी येण्याची गजर भासणार नाही. यासाठी निवडणूक आयोग एका महत्त्वाच्या योजनेवर काम करत आहे. या योजनेमुळे कोणत्याही पोलींग बुथवर जाऊन मतदान करता येणार आहे. मुख्य निवडणूक आयोग सुनिल अरोडा यांनी याविषयी माहिती दिली आहे. देशातील कोणत्याही मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याची योजना सुरु करण्यात येणार आहे. या नव्या योजनेसाठी निवडणूक आयोग काम करत आहे, असे त्यांनी सांगितले आहे. रिमोट वोटींग प्रोजेक्ट असे या योजनेचे नाव आहे.

मुख्य निवडणूक आयोगाने सांगितल्याप्रमाणे, IIT मद्रास आणि अन्य संस्थानांसोबत रिमोट वोटिंगच्या या प्रोजेक्टच्या रिसर्चला सुरुवात केली आहे. प्रत्येक निवडणूकीच्या वेळी हजारो मदतदार हे भौगोलिक कारणांमुळे मतदान करु शकत नाहीत. मतदान यादीत नाव असूनही हे मतदार वोटींग करत नाहीत. त्यामुळे आता या नव्या योजनेमुळे कोणत्याही ठिकाणी राहून मतदान करता येणार आहे. रिमोट वोटिंग प्रोटेक्ट अशा मतदारांसाठी असणार आहे जे काही कारणांमुळे मतदानाचा हक्क बजावू शकत नाहीत त्यांना या रिमोट वोटिंगचा फायदा होणार आहे.

रिमोट वोटिंगप्रमाणेच निवडणूक आयोग विदेशात राहणाऱ्या मतदारांसाठीही एक पोस्टल बॅलेट सुविधा सुरु करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे विदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांनाही आपला मतदानाचा हक्क बजवता येईल. मात्र निवडणूकींच्या काळात ज्यांना प्रत्यक्ष मतदान कक्षेत जाऊन मतदान करणे शक्य आहे त्यांनी तिथे जाऊन मतदान करणे आवश्यक आहे.


हेही वाचा – १००, १० व ५ च्या नोटा होणार बंद ? आरबीआयचे महत्त्वाचे अपडेट