घरदेश-विदेशराज्यसभेच्या १९ जागांसाठी आज मतदान; अनेक दिग्गज रिंगणात

राज्यसभेच्या १९ जागांसाठी आज मतदान; अनेक दिग्गज रिंगणात

Subscribe

तीन राज्यात अटीतटीचा सामना

कोरोना काळात राज्यसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय वारे वाहू लागले आहेत. आज ८ राज्यांमधील राज्यसभेच्या १९ जागांसाठी निवडणुका होणार आहेत. कॉंग्रेस आणि भाजपमधील अनेक बडे नेते रिंगणात आहेत. मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये रंगतदार लढाई होणार आहे.

मध्य प्रदेशात राज्यसभेच्या ३ जागांसाठी ४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी दोन उमेदवार उभे केले आहेत, तर गुजरातमधील चार जागांवर पाच उमेदवार निवडणूक लढवत आहेत. भाजपने तीन उमेदवार उभे केले आहेत, तर कॉंग्रेसचे दोन नेते निवडणूक लढवत आहेत. राजस्थानमध्येही राज्यसभेच्या तीन जागा असून ४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी दोन उमेदवार उभे केले आहेत. झारखंडमध्ये राज्यसभेच्या २ जागांसाठी ३ जण उभे आहेत. झारखंड मुक्ति मोर्चा, भाजप आणि कॉंग्रेसने प्रत्येकी एक उमेदवार उभा केला आहे. आंध्र प्रदेशात चार जागा असून पाच उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

- Advertisement -

ईशान्येकडील मणिपूर, मेघालय आणि मिझोरममध्ये राज्यसभेच्या एका जागेवर निवडणूक होणार आहे. मध्य प्रदेशात कॉंग्रेसच्या आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्यसभेसाठी दोन्ही जागा जिंकण्याच्या पक्षाचे अंकगणित गडगडलं आहे. मध्य प्रदेशमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजपकडून ज्योतिरादित्य शिंदे आणि सुमेरसिंग सोलंकी आणि कॉंग्रेसकडून दिग्विजय सिंह आणि फूलसिंह बरैय्या हे नेते रिंगणात उतरले असून निवडणुक रंगतदार होणार आहे.


हेही वाचा – पंतप्रधान मोदींची आज सर्वपक्षीय बैठक; हे नेते सहभागी होणार

- Advertisement -

कर्नाटकमधील ४ जागांवर माजी पंतप्रधान एचडी दैवेगौडा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, भाजपचे उमेदवार इरन्ना काडादी आणि अशोक गस्ती हे यापूर्वीच बिनविरोध विजयी झाले आहेत. तर, अरुणाचल प्रदेशमध्येही भाजप उमेदवार नबाम रेबिया यांनी बनविरोध विजय मिळवत खासदारकीची जागा काबीज केली आहे. दरम्यान, आज सायंकाळीच मतमोजणी होऊन विजयी आणि पराजीत जागांचं चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, सोशल डिस्टन्सिंगचे पालन व प्रत्येक उमेदवार आणि मतदाराचे थर्मल स्क्रीनिंग करुनच मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक आयोगाने तशी खबरदारी घेतली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -