घरदेश-विदेशउद्या उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान,जगदीप धनखड आणि मार्गारेट अल्वा रिंगणात

उद्या उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान,जगदीप धनखड आणि मार्गारेट अल्वा रिंगणात

Subscribe

उद्या उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे. या निवडणूकीच्या रिंगणात जगदीप धनखड आणि मार्गारेट अल्वा असून दोघांनी खासदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाल्यानंतर आता उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. 6 ऑगस्टला उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी मतदान होणार असून उद्याच मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत एनडीएकडून जगदीप धनखड आणि यूपीएकडून मार्गारेट अल्वा उभ्या आहेत. या निवडणुकीत राष्ट्रपतीपदासाठी भाजपला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेने उपराष्ट्रपतीपदासाठी युपीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. तर बहुजन समाज पार्टीने एनडीएला पाठिंबा दिला आहे.

उद्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी राज्यसभा आणि लोकसभा सदस्य मतदान करणारतात. यूपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांनी मतदान करण्याचे आवाहन खासदारांना केले आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत पक्षाचा व्हीप नाही. त्यामुळे भीती न बाळगता मतदान करा. उपराष्ट्रपती हा देशासाठी काम करणारा, निष्पक्ष असावा यासाठी मला मतदान करा, असे आवाहन मार्गारेट अल्वा यांनी केले आहे.

- Advertisement -

दोन्ही उमेदवार माजी राज्यपाल –

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उभे असलेले दोन्ही उमेदवार माजी राज्यपाल आहेत. धनखड हे पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. तर अल्वा या गुजरातच्या राज्यपाला होत्या. दोघेही माजी मंत्री असून पेशाने वकील आहेत.

- Advertisement -

शिवसेनेचा यूपीएला पाठिंबा –

शिवसेनेने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यूपीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने आधी यूपीएला पाठिंबा दिला होता. मात्र, खासदारांच्या दबावापोटी शिवसेनेने एनडीएला पाठिंबा दिला होता. आता उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भूमिका बदलली आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -