घरदेश-विदेश'वाह... क्या सीन है', काँग्रेसचा ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानींवर निशाणा

‘वाह… क्या सीन है’, काँग्रेसचा ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानींवर निशाणा

Subscribe

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly election, 2023) मिळालेल्या विजयामुळे काँग्रेस पक्षात (Congress) हुरूप आला आहे. आता काँग्रेसने पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. त्यादृष्टीने भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काँग्रेसने लक्ष्य केले आहे. आता पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) आणि प्रसिद्ध उद्योपती गौतम अदानी यांच्याबद्दल ‘वाह… क्या सीन है,’ असे ट्वीट करून काँग्रेसने कोपरखळी मारली आहे.

- Advertisement -

या वर्षाच्या उत्तरार्धात राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यानंतर लगेचच लोकसभा निवडणुका होतील. त्यामुळे भाजपा आणि काँग्रेस एकमेकांवर जोरदार टीका करीत आहेत. दोन्ही पक्षांमधील शब्दरण सोशल मीडियावरही पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्योगपती गौतम अदानी यांचे फोटो पाहात आहेत, असा फोटो बुधवारी सकाळी काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. त्याला काँग्रेसने ‘वाह… काय सीन’ असे कॅप्शन दिले आहे.

- Advertisement -

काँग्रेसने काल, मंगळवारी देखील ट्विटरवरून पंतप्रधान मोदी यांचा फोटो शेअर केला होता. या फोटोत दोन्ही बाजूच्या भिंतींवर गौतम अदानी यांची छायाचित्रे लावलेली दिसत आहेत. पंतप्रधान त्या चित्रांकडे लक्षपूर्वक पाहत आहेत, असे या फोटोत पाहायला मिळते. पंतप्रधानांचे हे छायाचित्र शेअर करताना काँग्रेसने ‘मेरी दुनिया’ असे कॅप्शन दिले आहे.

राहुल गांधींकडून वारंवार टीका
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वारंवार गौतम अदानी आणि पंतप्रधान मोदी यांच्या मैत्रीवरून चौफेर टीका केली आहे. संसदेतही याबाबत मुद्दा उचलून धरला, अदानींविषयी प्रश्न विचारले. परंतु, कालांतराने मला बोलू दिले नाही, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. गौतम अदानी यांची शेल कंपनी आहे. या कंपनीत 20 हजार कोटी गुंतवण्यात आले आहेत. परंतु, हा पैसा अदानी यांचा नाही. हे पैसे कोणाचे आहेत, असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.
तर, राहुल गांधी यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना, 2019पासून, समूहातील कंपन्यांनी त्यांचे हिस्से विकून 2.87 अब्ज डॉलर्स (सुमारे 20,000 कोटी) उभे केले आहेत, ज्यापैकी 2.55 अब्ज डॉलर्स व्यवसायात पुन्हा गुंतवले आहेत, असा खुलासा अदानी समूहाने केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -