घर देश-विदेश काही काळ थांबा... पाकव्याप्त काश्मीर आपोआप भारतात विलीन होईल; व्ही. के. सिंह...

काही काळ थांबा… पाकव्याप्त काश्मीर आपोआप भारतात विलीन होईल; व्ही. के. सिंह यांचे मिश्किल विधान

Subscribe

नवी दिल्ली : राजस्थानमधील दौसा येथे भाजपाच्या परिवर्तन संकल्प यात्रेनिमित्त रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री व्ही.के. सिंह (V.K. Singh) दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांना पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) शिया मुस्लिमांसाठी भारतातील रस्ते खुले करण्याबाबत विचारले असता, त्यांनी म्हटले की, काही काळ थांब, पाकव्याप्त काश्मिर आपोआप भारतात विलीन होईल. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. (Wait for a while Pakistan Occupied Kashmir will automatically merge with India A difficult statement by V K Singh)

हेही वाचा – Mamata Banerjee : आमचा भारत नावावर आक्षेप नाही, पण…; ममता बॅनर्जींचा मोदी सरकारवर निशाणा

- Advertisement -

दौसा येथे भाजपाच्या परिवर्तन संकल्प यात्रेदरम्यान पत्रकार परिषदेला संबोधित करताना व्ही. के. सिंह यांनी जी-20 च्या यशाबद्दल भाष्य केले. ते म्हणाले की, जी-20 कार्यक्रम यशस्वी झाला आहे. असा संघटित कार्यक्रम यापूर्वी कधीही झाला नव्हता. देशातील 60 शहरांमध्ये सुमारे 200 सभा आयोजित करण्यात आल्या. अशा यशस्वी कार्यक्रमासाठी इतर देशांनीही भारताचे कौतुक केले आहे.

हेही वाचा – G-20 मध्ये ऋषी सुनक यांच्याकडे दुर्लक्ष! ब्रिटिश मीडियाचा आरोप; म्हणाले…

भारताची आर्थिक प्रगती होईल

- Advertisement -

जी-20 परिषदेत प्रसिद्ध झालेल्या सामूहिक जाहीरनाम्यात भारताने मोठा विजय मिळवला आहे. युक्रेनसह अनेक मुद्द्यांवर जगाची विभागणी झाली होती, पण पंतप्रधान मोदींमुळे आपण सर्वांनी मिळून एक असा मार्ग शोधला, ज्यावर कोणत्याही देशाचा आक्षेप नव्हता. जैवइंधन अलायन्स आणि भारत ते युरोप कॉरिडॉरचे बांधकाम यामुळे भारताची आर्थिक प्रगती होईल, असेही व्ही. के. सिंह म्हणाले.

हेही वाचा – कदाचित आम्ही सरकारला अडचणीत आणलं; राहुल गांधींनी ‘इंडिया वि. भारत’ वादावर केंद्राची उडवली खिल्ली

मोदीच्या करिष्म्यावरच भाजपा निवडणूक लढवते

राज्यात भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत प्रश्न विचारला असताना व्ही. के. सिंह म्हणाले की, जिथे निवडणुका होतात तिथे भाजपा मुख्यमंत्रिपदाची घोषणा करत नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिष्म्यावरच भाजपा निवडणूक लढवते. जे चांगले, उपयुक्त आणि ज्यांच्यावर जनतेचा विश्वास आहे, अशा नेत्यांना भाजपा पक्ष संधी देते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -