घरCORONA UPDATEझोपेतून जागे व्हा ! IMA ची केंद्राच्या लसीकरणावर टीका अन् Lockdown सल्ला

झोपेतून जागे व्हा ! IMA ची केंद्राच्या लसीकरणावर टीका अन् Lockdown सल्ला

Subscribe

कोरोनामुळे निर्माण झालेल्या भयानक परिस्थितीशी लढण्यासाठी काही कठोर पावले उचलण्याची गरज

देशातील कोरोना (Covid 19) परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. देशातील रुग्णांची संख्या ४ लाखांवर पोहचली आहे. आज देशात ४ लाख ३ हजार ७३८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनाच्या भयानक परिस्थितीवर इंडिया मेडिकल असोसिएशनने (IMA – Indian Medical Association) देशात संपूर्ण लॉकडाऊनची मागणी केली आहे. झोपेतून जागे व्हा! कोरोनामुळे निर्माण झालेल्या भयानक परिस्थितीशी लढण्यासाठी काही कठोर पावले उचलण्याची गरज आहे. देशातील कोरोनाची परिसस्थिती आटोक्यात आणण्यासाठी स्वास्थ मंत्रालय सुस्त झाले आहे. केवळ काही राज्यात लॉकडाऊन करुन चालणार नाही. देशाला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याची मागणी IMAने केली आहे. देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु करुनही आज देशात कोरोनाबाधितांची संख्या ४ लाखांहून अधिक आहे,अशी टिकीही IMAने केंद्रावर केली.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आता झोपेतून जागे व्हा, देशात आलेल्या कोरोनाच्या दुसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी काही महत्त्वाची पाऊले उचलणे गरजेचे आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी ठोस पाऊले उचलत नाहीत, असा आरोपही IMAने केला आहे. त्याचबरोबर आरोग्य मंत्रालयाच्या हलगर्जीपणामुळे कोरोना संपूर्ण देशभर कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या बेजाबाबदारपणामुळे देशात भयानक कोरोनाची दुसरी लाट आली आहे,असाही आरोप करण्यात आला आहे.

- Advertisement -


IMAच्या म्हणण्यानुसार, कोरोनाची लाट थोपण्यासाठी IMAने संपूर्ण देशात लॉकाडाऊन करण्याचा सल्ला दिला होता. मात्र आरोग्य मंत्रालयाने हा प्रस्ताव फेटाळून लावला. IMAने लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, गेल्या २० दिवसांपासून देशात नियोजित पद्धतीने संपूर्ण लॉकडाऊन करण्याची मागणी केली जात आहे. मात्र केंद्रसरकारकडून अद्याप कोणताही प्रतिसाद आलेला नाही.

देशातील प्रत्येक राज्यात लॉकडाऊन लावून काहीही फायदा नाही. त्याचबरोबर नाईट कर्फ्यू लावूनही काही उपयोग नाही. जोपर्यंत राष्ट्रीय पातळीवर लॉकडाऊन केला जात नाही तोपर्यंत देशातील कोरोना कमी होणार नाही, असे IMA ने म्हटले आहे. केंद्राने आतापर्यंत लॉकडाऊन करण्याचा प्रस्ताव मान्य केला असता तर देशात बाधितांची संख्या ४ लाखांवर गेली नसती,असेही IMA ने म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सहा फुटांपेक्षा जास्त अंतरावरूनही होऊ शकते कोरोनाची लागण, अमेरिकेच्या CDCचा अहवाल

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -