घरदेश-विदेश'या' कंपनीने 200 कर्मचाऱ्यांची एक झटक्यात केली हकालपट्टी; सांगितले हे मोठं कारण

‘या’ कंपनीने 200 कर्मचाऱ्यांची एक झटक्यात केली हकालपट्टी; सांगितले हे मोठं कारण

Subscribe

जगावर आर्थिक मंदीचा धोका वाढत आहे. यासोबत महागाईतील सततच्या वाढीमुळे नागरिकांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागतोय. याचा परिणाम आता जगभरात दिसून लागला आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे रिटेल कंपनी वॉलमार्ट. ज्याने आपल्या 200 कर्मचाऱ्यांना क्षणार्धात बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

बिजनेस स्टँडर्डच्या माहितीनुसार, वॉलमार्ट इंकने जवळपास 200 कॉर्पोरेट नोकऱ्यांवर गदा आणली आहे. कारण कंपनी वाढता खर्च आणि घटती मागणी या परिस्थितीचा सामना करत आहे. वॉलमार्टने कर्मचाऱ्यांची केलेली ही कपात कंपनीची स्थिती सुधारण्यासाठी आणि भक्कम भविष्यासाठी उचललेले पाऊल असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

या विभागातील कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

वॉलमार्टने ज्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे त्यात डिलिव्हरी आणि मर्चेंडाइजिंग विभागांशी संबंधित कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या संदर्भात कंपनीने बुधवारी एक ईमेल पाठवत म्हटले की, आम्ही कंपनीच्या स्ट्रक्चरला अपडेट करत आहोत. ज्या माध्यमातून कंपनीच्या एक मजबूत भविष्यासाठी आणि कंपनीच्या स्पष्ट आणि निवडक भूमिकांना विकसित केले जाईल, वॉलमार्टच्या शेअर्समध्ये यावर्षी आतापर्यंत 9.8 टक्क्यांची घसरण झाली आहे.

वॉलमार्टमध्ये 1.6 लाख कर्मचाऱ्यांना नोकऱ्या

वॉलमार्ट ही अमेरिकेतील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी नियोक्ता कंपनी आहे, ज्यात सुमारे 1.6 लाख कर्मचारी कार्यरत आहेत. नियामक फाइलिंगनुसार, वॉलमार्टच्या एकूण कर्मचार्‍यांपैकी 100,000 पेक्षा जास्त व्यवस्थापन आणि व्यावसायिक कर्मचारी आहेत. कंपनीने केलेल्या या कर्मचारी कपातीची माहिती वॉल स्ट्रीट जर्नलच्या हवाल्याने छापण्यात आली आहे.

- Advertisement -

यापूर्वी अॅमेझॉननेही आपल्या कर्मचाऱ्यांची एक लाख कपात केली होती. त्याचवेळी वॉलमार्टनंतर इतरही अनेक बड्या कंपन्या असे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. अहवालानुसार, आर्थिक व्यवहारात होणारी घट पाहता चिंता वाढतेय. अशा परिस्थितीत फोर्ड मोटर कंपनी सुमारे 8,000 कर्मचार्‍यांना काढून टाकण्याची योजना आखत आहे. Facebook ची मूळ कंपनी Meta Platforms Inc. ने देखील नोकरभरतीत 30 टक्के कपात करण्याची योजना आखली आहे. याशिवाय गुगलने नोकरभरतीची गती कमी केली आहे.


हेही वाचा : आमच्यासाठीही न्यूड फोटोशूट कर; पेटाचे रणवीर सिंहला लेटर


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -