घरदेश-विदेशभारतासोबत संबंध सुधारण्याची गरज - कुरेशी

भारतासोबत संबंध सुधारण्याची गरज – कुरेशी

Subscribe

भारतासोबत संबंध सुधारण्याची गरज असल्याचे मत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्त केले आहे.

भारतासोबत संबंध सुधारण्याची गरज असल्याचे मत पाकिस्तानचे नवनिर्वाचित परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी व्यक्त केली आहे. इस्लामाबादमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपले मत व्यक्त केले. त्यानंतर काश्मीरसारख्या प्रश्नांवर तोडगा निघू शकेल असे मत देखील शाह मोहम्मद कुरेशी यांनी व्यक्त केले आहे. मात्र यासाठी समोरील बाजुने देखील मैत्रिचा हात पुढे येण्याची गरज असल्याचे कुरेशी यांनी म्हटले आहे. सध्या तरी भारत – पाकिस्तानमध्ये कोणताही संवाद नाही आहे. हा संवाद पुढे जायला हवा त्यानंतरच प्रत्येक प्रश्नावर तोडगा निघेल असे मत कुरेशी यांनी व्यक्त केले. २०१६ पासून भारत – पाकिस्तानमधील संवाद बंद आहे. दरम्यान पाकिस्तानकडून सुरू असलेल्या कुरापती काही बंद झालेल्या नाहीत.

वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इम्रान खान यांना फोन

काय म्हणाले कुरेशी

पाकिस्तानला भारताशी असलेल्या संबंधांमध्ये सुधारणा करायची आहे. त्याशिवाय काश्मीर सारख्या प्रश्नावर तोडगा निघणार नाही. तसेच भारताकडे मैत्रिचा हात पुढे करण्यास पाकिस्तानला कमीपणा देखील वाटत नाही. यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील कुरेशी यांच्याशी पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली.

- Advertisement -

वाचा – इम्रान खान यांच्या शपथविधीसाठी सिद्धू आज पाकिस्तानात

मैत्रिसाठी इम्रान खान यांचा पुढाकार

दरम्यान, मैत्रिसाठी पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील पुढाकार घेतला आहे. भारताने एक पाऊल पुढे टाकल्यास पाकिस्तान दोन पावले पुढे येण्यास तयार असल्याचे इम्रान खान यांनी स्पष्ट केले होते. विजयानंतर त्यांनी २६ जुलै रोजी पाकिस्तानी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आपली भावना बोलून दाखवली होती.

- Advertisement -
वाचा – इम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान!!

कुलभूषण जाधव प्रकरण

दरम्यान, कुलभूषण जाधव प्रकरणामध्ये पाकिस्तानकडे ठोस पुरावे आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये पाकिस्तान ते मांडेल आणि केस जिंकेल. असा दावा देखील कुरेशी यांनी केला आहे. एप्रिल २०१७ साली कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने हेरगिरीच्या नावाखाली अटक केली आहे. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने जाधव यांना फाशी दिल्यानंतर भारताने त्याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये धाव घेतली. सध्या या प्रकरणाची सुनावणी आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये सुरू आहे.

वाचा – पाकचं नवं सरकारही कुलभूषण जाधव यांच्या विरोधातच

वाचा – कुलभूषण जाधव केस:पाक ICJमध्ये आज सादर करणार प्रतिज्ञापत्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -