घरदेश-विदेश'एकदा त्यांचं भाषण ऐकायचं आहे'

‘एकदा त्यांचं भाषण ऐकायचं आहे’

Subscribe

अटलजींना 'राजकारणातील विद्यापीठ' म्हटले जाते. राजकारणातील त्यांचा अभ्यास दाणगा... त्यामुळेच त्यांची भाषणे नेहमीच त्या काळातील अनेकांना आजही आठवतात.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक आहे. देशभरात त्यांच्या प्रकृती स्वास्थासाठी पूजा- अर्चा सुरु आहे. अटलजींचे भाषण कौशल्य सगळ्यांनाच माहित आहे. एकदा त्यांचे भाषण ऐकायचे आहे, अशी इच्छा अटलजींची भाची कांती मिश्रा यांनी व्यक्त केली आहे. काहीच वेळापूर्वी एम्स रुग्णालयाने एक मेडिकल बुलेटीन केले. ज्यात त्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचे म्हटले होते. आता पुढील अर्ध्या तासाने एम्स पुन्हा एकदा मेडिकल बुलेटीन देणार आहे.

अटलजींचे भाषण कौशल्य

अटलजींना’राजकारणातील विद्यापीठ’ म्हटले जाते. राजकारणातील त्यांचा अभ्यास दाणगा… त्यामुळेच त्यांची भाषणे नेहमीच त्या काळातील अनेकांना आजही आठवतात. त्यामुळेच त्यांचे भाषण पुन्हा एकदा ऐकण्याची इच्छा अटलजींची भाची कांती मिश्रा यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्याविषयी बोलताना त्यांचा बांध फुटला. यावेळी त्या अटलजींबदद्ल भरभरुन बोलल्या.

- Advertisement -

(सौजन्य-QUINT)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -