Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी कोरोना रुग्णाचा ऑक्सिजन काढून महिला लागल्या पूजा करायला!, व्हिडिओ पाहून व्हाल हैराण

कोरोना रुग्णाचा ऑक्सिजन काढून महिला लागल्या पूजा करायला!, व्हिडिओ पाहून व्हाल हैराण

Related Story

- Advertisement -

देशात कोरोना व्हायरसचा हाहाकार सुरू आहे. कोरोनामुळे दिवसाला ३ ते ४ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहे. पण कोरोना रुग्णांचे नातेवाईक पूजापाठच्या नावाखाली आपल्याच रुग्णांचा जीव धोक्यात घालताना दिसत आहे. अशीच हैराण करणारी घटना उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये घडली आहे. या घटनेच्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून कानपूरमधील हॅलट रुग्णालयातील (Hallet Hospital) कोविड वॉर्डमधील व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे.

नक्की व्हिडिओमध्ये काय आहे?

व्हिडिओमध्ये पाहू शकता की, दोन महिला आपल्या रुग्णाचा बेड घेरतात आणि पूजापाठ करण्यास सुरुवात करतात. वैदिक मंत्रोच्चारणासोबत देवाचे नाव घेऊन जयजयकार करू लागतात. पूर्ण वॉर्डमध्ये या दोन महिलांचा आवाज आहे. घटनास्थळी असलेल्या एका व्यक्तीने घटनेचा व्हिडिओ काढून तो व्हायरल केला आहे. पण यादरम्यान महिलांना यांची अजिबात चिंता नाही आहे की, त्यांना कोरोना होऊ शकतो आणि तिथून बाहेर पडल्यानंतर इतर लोकांमध्येही त्याचा फैलाव होऊ शकतो.

- Advertisement -

दरम्यान महिलांनी पूजापाठ करताना चक्क रुग्णाची ऑक्सिजन नळी काढली. जेव्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्यासोबत भांडण करायला लागल्या. पण दुर्दैवाने काही वेळानंतर रुग्णांचा मृत्यू झाला आणि रुग्णालयात दोन्ही महिला हंगामा करू लागल्या. वॉर्डच्या डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करून लागल्या. मग यासर्व घटनेनंतर दुसऱ्या दिवशी कोरोना नियमांनुसार रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

माहितीनुसार, या दोन्ही महिला रात्रीच्या वेळी जबरदस्ती रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये घुसरल्या होत्या. त्यांना थांबवण्याचा बराच प्रयत्न केला, परंतु त्यांनी कोणाचेही ऐकले नाही, असे सांगितले जात आहे.

- Advertisement -

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जीएसवीएम मेडिकल कॉलेज मुख्याध्यापक डॉक्टर आरबी कमल यांनी सांगितले की, ‘२२ एप्रिलचा हा व्हिडिओ आहे. रुग्णाला कोरोना वॉर्ड नंबर चारमध्ये दाखल केले गेले होते. डॉक्टर अलोक वर्मा त्या रुग्णावर उपचार करत होते. रात्रीच्या वेळी दोन महिला आपल्या रुग्णाला बघण्याच्या बहाण्याने वॉर्डमध्ये जबरदस्ती घुसल्या होत्या. त्यांनी नर्सला सांगितले की, रुग्ण तुमच्या उपचारांनी ठीक होणार नाही. त्याच्यावर भूतबाधा झाली आहे. त्यानंतर दोन्ही महिला बेडवर जाऊन पूजापाठ करू लागल्या.’

आरबी कमल पुढे म्हणाले की, ‘अनेक वेळा खाण्याच्या आणि औषधाच्या बहाण्याने नातेवाईक रुग्णांना भेटण्यासाठी हट्ट करतात. कधी-कधी भेटण्यासाठी लालच दिली जाते.’

पाहा कानपूरमधील रुग्णालयातील धक्कादायक व्हिडिओ

 

अंधविश्वास की पराकाष्ठा..

ऑक्सीजन मास्क निकाला, जयकारे लगाए
मरीज की जान खतरे में डाली…

वीडियो कानपुर के हैलट अस्पताल का बताया जा रहा है…

Posted by Vishal Tripathi on Wednesday, May 12, 2021


हेही वाचा – पहिल्या बायकोसोबत नवऱ्याची वाढली जवळीक; संतप्त झालेल्या दुसऱ्या बायकोने उचलले टोकाचे


 

- Advertisement -