घरताज्या घडामोडीदिल्लीतील यमुनेने ओलांडली धोक्याची पातळी; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

दिल्लीतील यमुनेने ओलांडली धोक्याची पातळी; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Subscribe

दिल्लीत बुधवारी सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे नदी व नाले दुथडी भरून वाहत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यमुना नदीने धोक्याचे चिन्हं २०४.५ मीटर ओलांडले आहे.

दिल्लीत बुधवारी सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे नदी व नाले दुथडी भरून वाहत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यमुना नदीने धोक्याचे चिन्हं २०४.५ मीटर ओलांडले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (water level crossed the danger mark yamuna river again raised flood threat in delhi)

मिळालेल्या माहितीनुसार, वरच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असताना हरियाणाने हथनीकुंड बॅरेजमधून अधिक पाणी सोडल्यामुळे यमुनेच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे यमुनेच्या पाण्याच्या पातळीने धोक्याचे चिन्ह ओलांडली. त्यामुळे सखल भागात राहणाऱ्या सुमारे 7,000 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास अधिकाऱ्यांना हलवण्यत आले आहे.

- Advertisement -

सोमवारी पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हापेक्षा खाली गेली होती आणि मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता 203.96 मीटरवर राहिली. याबाबत दिल्ली सरकारच्या पूर नियंत्रण कक्षाने अधिक माहिती दिली आहे. ‘यमुना नदीच्या पाण्याची पातळी पुन्हा वाढली असून, मध्यरात्रीच्या सुमारास धोक्याचे चिन्ह ओलांडले आहे.

‘बुधवारी सकाळी 6 वाजता हरियाणातील यमुना नगर येथील हथनीकुंड बॅरेजमधून सुमारे 14,000 क्युसेक पाणी सोडण्यात आले. मंगळवारी सायंकाळी 7 वाजता 19,745 क्युसेक पाणी सोडण्यात आले’, असे दिल्लीच्या पूर नियंत्रण कक्षाने सांगितले.

- Advertisement -

केंद्रीय जल आयोगाने जारी केलेल्या अंदाजानुसार, रात्री 9 वाजेपर्यंत नदीच्या पाण्याची पातळी 205.25 मीटरपर्यंत वाढण्याची आणि त्यानंतर स्थिर राहण्याची शक्यता आहे.  तसेच, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सांगितले की, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये येत्या दोन-तीन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – आले, आले 50 खोके आले; विरोधी पक्षाचा शिंदे गटावर हल्लाबोल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -