घरदेश-विदेश'रक्तात विषाणूचं सक्रमण, उपचार मात्र दातावर!'

‘रक्तात विषाणूचं सक्रमण, उपचार मात्र दातावर!’

Subscribe

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक जिंककल्यानंतर गंगा नदीचे शुद्धीकरण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु गेल्या साडे चार वर्षांमध्ये गंगा नदीचे हवे तसे शुद्धिकरणाचे काम झालेले नाही, असे पाणीतज्ज्ञ राजेंद्र सिंह म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यप्रणालीवर प्रसिद्ध पाणीतज्ज्ञ आणि मॅगसेसे पुरस्कार विजेते राजेंद्र सिंह यांनी टीका केली आहे. नरेंद्र मोदी यांनी गंगा नदी शुद्धीकरणाचा नारा दिला होता. परंतु, वास्तवात नरेंद्र मोदींनी गेल्या साडे चार वर्षात गंगा शुद्धिकरणासाठी काहीही केलेले नाही, असे राजेंद्र सिंह म्हणाले आहेत. गंगा शुद्धिकरणाच्या नावाखाली फक्त किनारेच साफ केले जात आहेत. गंगेच्या प्रदुषणाकडे आणि किनाऱ्यावरील अतिक्रमण याकडे दुर्लक्ष केले जात असून मोदी सरकारची अशा प्रकारची कार्यप्रणाली म्हणजे ‘रक्तात विषाणूचं सक्रमण आणि उपचार मात्र दातावर’ असे असल्याचे सिंह म्हणाले आहेत. ते गंगा सद्भावना यात्रेसाठी पश्चिम बंगालला आले होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.

हेही वाचा – ‘नरेंद्र मोदी २१व्या शतकातील आंबेडकर’

- Advertisement -

‘गंगा शुद्धिकरणाच्या नावावर लाखो रुपयांचा भ्रष्टाचारा’

भारतातील गंगा नदी ही प्रमुख नदी आहे. ही नदी मोठी आणि समृद्ध अशी आहे. परंतु, धार्मिक आणि इतर कारणांमुळे या नदीचे पाणी प्रदुषित झाले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक जिंककल्यानंतर गंगा नदीचे शुद्धीकरण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु गेल्या साडे चार वर्षांमध्ये गंगा नदीचे हवे तसे शुद्धिकरणाचे काम झालेले नाही, असे राजेंद्र सिंह म्हणाले आहेत. गंगा नदिच्या शुद्धीकरणाच्या नावाखाली पंतप्रधानांनी भ्रष्ट्राचार वाढवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याचबरोबर गंगेच्या मुद्यावरुन मोदी सरकार धर्माचे राजकारण करत असल्याचे सिंह यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, पंतप्रधानांना गंगेला हिंदूंची नदी घोषित करायची आहे. परंतु, गंगा ही सर्व धर्मिय नागरिकांची आहे. पंतप्रधान नदीवरुन समाजात फूट पाडत आहेत, असा आरोपही राजेंद्र सिंह यांनी केला आहे.


हेही वाचा – सोलापूर दौरा; मोदींनी फुंकले लोकसभेचं रणशिंग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -