घर देश-विदेश आम्ही तर आधीच चंद्रावर..., पाकिस्तानच्या तरुणांची बोलकी प्रतिक्रिया

आम्ही तर आधीच चंद्रावर…, पाकिस्तानच्या तरुणांची बोलकी प्रतिक्रिया

Subscribe

नवी दिल्ली : भारतची चांद्रयान-3 यशस्वीपणे पूर्ण झाली. यानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत हा पहिला देश झाला आहे. भारताच्या चांद्रयान -3 मोहीम यशस्वी झाल्यानंतर जगभरातून भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या शास्रज्ञांचे कौतुक होत आहे. रशिया, अमेरिका, चीननंतर चंद्रावर उतरणारा भारत हा चौथा देश बनला आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या लोकांनी देखील भारताच्या चांद्रयान -3 मोहीमेच्या यशाचे तोंडभरून कौतुक केले आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानाच्या एका तरुणाने आपल्याच देशाला घरचा आहेर दिला आहे आणि पाकिस्ताच्या सध्य स्थितीवर निशाणा साधला आहे.

फवाद चौधरी यांनी यूट्यूब चॅनलवर चांद्रयान – 3 च्या यशस्वी कामगिरीवर पाकिस्तानच्या सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. यात एका तरुणाने भारताच्या चांद्रयाना – 3 च्या यशावर बोलताना पाकिस्तानच्या सध्याच्या परिस्थितीवर मिश्किल टीका केली आहे. या तरुणांचा व्हिडीओ सध्या सशोल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Chandrayan 3 : भारताचं चंद्रावर Moon Walk; इस्रोने ट्वीट करत दिली माहिती

तरुणांची पाकिस्तानच्या परिस्थितीवर बोलकी प्रतिक्रिया

- Advertisement -

या तरुणांनी पाकिस्तानवर टीका करताना म्हणाला, “भारत हा पैसे खर्च करून चंद्रावर केला आहे. पण आपण आधीच चंद्रावर राहतो. कारण चंद्रावर पाणी नाही, येथेही म्हणजे पाकिस्तानमध्ये देखील पाणी नाही. चंद्रावर गॅस नाही, इकडेही गॅस नाही. चंद्रावर वीज नाही, इथेपण वीज नाही. यामुळे आपण आधीपासूनच चंद्रावर राहत आहोत”, अशी मिश्किल टीका करत पाकिस्तानच्या परिस्थितीवर ताशेरे ओढले आहे. या तरुणांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा – Chandrayan 3 : चंद्रावरून आला रोव्हर ‘प्रज्ञान’चा पहिला फोटो; INSPACE च्या अध्यक्षांनी केला शेअर

रोव्हर ‘प्रज्ञान’ देखील रॅम्पद्वारे लँडरमधून बाहेर पडले

भारताचे ‘चांद्रयान-3’चे लँडर यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरल्यानंतर त्याठिकाणी अभ्यास करण्यासाठी रोव्हर ‘प्रज्ञान’ देखील रॅम्पद्वारे लँडरमधून बाहेर पडले आहे. सध्या ते चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर ‘विक्रम’ लँडरचा स्पर्श झाल्यानंतर काही तासांनी रोव्हर बाहेर पडत असल्याचे चित्रात दिसते. रॅम्पवर लँडरवरून उतरलेल्या रोव्हरचे पहिले छायाचित्र INSPACE चे अध्यक्ष पवन के गोयंका यांनी ट्वीटरवर शेअर केले आहेत.

- Advertisment -