घरदेश-विदेशआम्ही यूपी निवडणुका लढणार, 2024 च्या परिवर्तनासाठी महत्त्वाचं पाऊल ठरणार, संजय राऊतांचा...

आम्ही यूपी निवडणुका लढणार, 2024 च्या परिवर्तनासाठी महत्त्वाचं पाऊल ठरणार, संजय राऊतांचा हुंकार

Subscribe

पाच राज्यांत निवडणुका होत आहेत. त्यात उत्तर प्रदेश सर्वात महत्त्वाचं राज्य आहे. इथली निवडणूक आणि निकाल देशाच्या राजकारणाची दिशा आणि दशा काय असेल याचा निर्णय देतात. त्यामुळेच पूर्ण देश उत्तर प्रदेशमध्ये काय होतंय, याकडे लक्ष देऊन पाहत आहे. मी माझ्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी इथे आलो आहे.

लखनऊः उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीत शिवसेना 50 उमेदवार देणार असून, त्यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत लखनऊमध्ये पोहोचलेत. आम्ही निवडणुका लढणार आहोत आणि 2024 च्या परिवर्तनसाठी महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे. आम्ही कोणत्याही मोठ्या पक्षासोबत युती केलेली नाही. जेसुद्धा निकाल येतील ते 2024च्या लोकसभा निवडणुकीला प्रभावित करतील, असंही संजय राऊतांनी अधोरेखित केलंय. उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेचे लखनऊचे उमेदवार गौरव वर्मा यांच्या प्रचारसभेत संजय राऊत बोलत होते.

पाच राज्यांत निवडणुका होत आहेत. त्यात उत्तर प्रदेश सर्वात महत्त्वाचं राज्य आहे. इथली निवडणूक आणि निकाल देशाच्या राजकारणाची दिशा आणि दशा काय असेल याचा निर्णय देतात. त्यामुळेच पूर्ण देश उत्तर प्रदेशमध्ये काय होतंय, याकडे लक्ष देऊन पाहत आहे. मी माझ्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी इथे आलो आहे. उत्तर प्रदेश खूप मोठं राज्य आहे. उत्तर प्रदेशात आम्ही 15 ते 20 जागांवर निवडणुका लढवणार आहोत. त्याची तयारी सुरू आहे. तसेच आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर 100 जागांवर लोकसभेच्या निवडणुका लढणार आहोत, असा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतलाय, असंही संजय राऊतांनी सांगितलंय.

- Advertisement -

पूर्ण देशात निवडणुका लढणार असलो तरी सुरुवात उत्तर प्रदेशातून केली जाणार आहे. महाराष्ट्राच्या बाहेर दादरा नगर हवेलीमध्ये आम्ही खातंसुद्धा उघडलंय. जो केंद्रशासित प्रदेश आहे. गुजरात राज्याला लागू असलेला प्रदेश आहे. इथे अनेक प्रश्न आहेत, इथे एका राजकीय नेत्यावर गोळ्या झाडल्या जातात. सर्वात मोठं आंदोलन शेतकऱ्यांनी केलं आहे. त्यामुळेच आमच्यासोबत किसान रक्षा पार्टीचे नेतेसुद्धा आहेत. आम्ही निवडणुका लढणार आहोत आणि 2024 च्या परिवर्तनसाठी महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे. आम्ही कोणत्याही मोठ्या पक्षासोबत युती केलेली नाही. जेसुद्धा निकाल येतील ते 2024च्या लोकसभा निवडणुकीला प्रभावित करतील, असंही ते म्हणालेत.


हेही वाचाः मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाची मोर्चेबांधणी; आशिष शेलारांवर सोपावली मोठी जबाबदारी

- Advertisement -

 

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -