नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता लोकसभा, राज्यसभेतील खासदाराबाबत माहिती समोर येऊ लागली आहे. कोणत्या खासदारांवर किती गुन्हे दाखल आहेत तर कुणाकडे किती संपत्ती आहे. याबाबत एक माहिती समोर आली आहे ती म्हणजे खासदारांच्या संपत्तीची. देशातील खासदारांपैकी सर्वाधिक श्रीमंत खासदार हे तेलंगणा राज्यातील असून, यामध्ये महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. (Wealth Telangana state MP tops wealthiest Maharashtra at fourth position)
द असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (ADR) च्या अहवालानुसार, देशातील खासदारांच्या श्रीमंतीची माहिती समोर आली असून, यामध्ये कोणत्या खासदारांवर किती गुन्हे दाखल आहेत याबाबत माहिती समोर आली आहे.
गुन्हे दाखल असणाऱ्यांकडे सर्वाधिक पैसा
द असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (ADR) च्या अहवालानुसार, लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची सरासरी मालमत्ता 38.33 कोटी रुपये आहे. यातही ज्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल आहेत त्यांची मालमत्ता 50.03 कोटी तर गुन्हे दाखल नसलेल्या खासदारांची मालमत्ता सरासरी 30.50 कोटी आहे.
हेही वाचा : स्वयंसेवक संघाची पुण्यातील बैठक ठरवणार लोकसभेची दिशा; देशभरातील 266 पदाधिकारी राहणार हजर
भाजपचे खासदार सर्वाधिक श्रीमंत
याच अहवालानुसार सध्या लोकसभा आणि राज्यसभेतील एकुण खासदारांपैकी सर्वाधिक श्रीमंत खासदार हे भाजप पक्षाचे असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये भाजपचे 385, त्यानंतर टीआरएसचे 26, वायएसआरसीपीचे 31, कॉंग्रेसचे 81, आपचे 11 डीएमकेचे 34, शिरोमणी अकाली दलचे 2 राजदचे 6 तर अपक्ष 6 खासदारांचाही यामध्ये समावेश आहे.
श्रीमंतीत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर
सर्वाधिक श्रीमंत खासदार असलेल्या राज्यापैकी तेलंगणा राज्यातील खासदार सर्वाधिक श्रीमंत असून, त्यांची संख्या 24 एवढी आहे पण त्यांच्याकडे तब्बल 6 हजार कोटी 294 लाख, तर आंध्रप्रदेशातील 36 खासदारांकडे 5 हजार कोटी 427 लाख, उत्तर प्रदेशातील 108 खासदारांकडे 3 हजार कोटी 340 लाख, महाराष्ट्रातील 65 खासदारांकडे 1 हजार कोटी 181 लाख, पंजाबमधील 20 खासदारांकडे 1 हजार कोटी 778 लाख, कर्नाटकमधील 39 खासदारांकडे 1 हजार कोटी 339 लाख तर मध्यप्रदेशातील 40 खासदारांकडे 1 हजार कोटी 311 लाख, तामिळनाडुतील 57 खासदारांकडे 1 हजार कोटी 203 लाख, गुजरातमधील 37 खासदारांकडे 1 हजार कोटी 178 लाख आणि पंश्चिम बंगालमधील 58 खासदारांकडे 1 हजार कोटी 50 लाख रुपयांची संपत्ती असल्याचे समोर आले आहे.
असे आहेत अब्जाधीश खासदार
भाजपमधील 14 खासदार हे अब्जाधीश आहेत. तर YSRCP चे 7, TRS चे 7, कॉंग्रेसचे 6, आम आदमी पक्षाचे 3 आणि राजदचे 2 खासदार हे अब्जाधीश असल्याची माहिती समोर आली आहे.