घरताज्या घडामोडीमेच्या 'या' आठवड्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

मेच्या ‘या’ आठवड्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

Subscribe

स्कायमेटने मेचा पहिला आठवडा शेतकऱ्यांसाठी कठीण असल्याचं म्हटलं आहे.

देशातील अनेक राज्यात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशभरात उष्णतेने लोक हैराण झाले आहेत. मात्र, काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, पंजाब आणि हरियाणा इत्यादी अनेक राज्यात मुसळधार पावसानं आणि गारपिटीनं कहर केला आहे. असं असताना काही ठिकाणी उष्णता वाढली आहे. मात्र, मेच्या पहिल्या आठवड्यात अनेक राज्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस पडणार आहे.

स्कायमेट या खाजगी कंपनीच्या म्हणण्यानुसार, अनेक ठिकाणी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एक-दोन दिवस उष्णता असेल. त्यानंतर तिथे पुढील काही दिवसांत पाऊस पडेल. हवामान खात्यानं मेचा पहिला आठवडा शेतकऱ्यांसाठी कठीण असल्याचं म्हटलं आहे. स्कायमेट या खासगी हवामान अंदाज संस्थेच्या मते मे महिन्यात उत्तर भारतात १ ते ३ मे दरम्यान हवामान खुलं राहील, परंतु काही ठिकाणी तापमान कमी होऊ शकतं. यानंतर उत्तर भारतात ६ मेपर्यंत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा – दिल्लीतील ‘सीआरपीएफ’चं मुख्यालय केलं सील; अधिकाऱ्याला कोरोनाची लागण


दिल्ली-एनसीआर, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश अशा अनेक राज्यात ३ ते ६ मे दरम्यान वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा, झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशात ४ते ७ मे दरम्यान असाच पाऊस पडेल.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -