घरदेश-विदेशWeather Update : राजधानी दिल्लीत अवकाळी पावसामुळे थंडीची लाट; जाणून घ्या उर्वरित...

Weather Update : राजधानी दिल्लीत अवकाळी पावसामुळे थंडीची लाट; जाणून घ्या उर्वरित राज्यांची स्थिती

Subscribe

अशा स्थितीत 3 फेब्रुवारीला दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणाच्या अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सध्या उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागतोय. मात्र ही थंडी केव्हा संपणार असा प्रश्न उपस्थित होतोय. अशातच हवामान खात्याने आज देशाच्या अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. दिल्ली एनसीआरमध्ये आजपासूनचं हवामानात अनेक बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्ली एनसीआरमध्ये काल रात्री उशिरापासून वेगवान वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दिल्ली आणि एनसीआरमध्ये 20 ते 30 कि.मी वेगवान वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात होईल. हिंडन एअर फोर्स, लोनी देहाट, गाझियाबाद, नोएडा, ग्रेटर नोएडा, इंदिरापुरम, गुरुग्राम आणि कुरुक्षेत्र या भागात पाऊस पडू शकतो.

हवामान खात्याने सांगितले की, गुरुवारी दिल्ली आणि लगतच्या अनेक भागात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. त्यामुळे दिवसा राजधानीत थंडीचा कडाका आणखी वाढेल. तर गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरणासह जोरदार वारे वाहतील.

- Advertisement -

देशाच्या अनेक भागात पावसाची शक्यता

स्कायमेट वेदरच्या माहितीनुसार, चक्रीवादळाचे क्षेत्र पाकिस्तानच्या मध्यवर्ती भागावर आणि पंजाब आणि वायव्य राजस्थानला लागून आहे. त्याचवेळी अरबी समुद्रातून येणारे दमट वारेही परिसरात आर्द्रता निर्माण करतील. अशा स्थितीत 3 फेब्रुवारीला दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणाच्या अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उत्तर किंवा उत्तर-पश्चिम दिशेकडून बर्फाळ वारे वायव्य भारताकडे येतील, ज्यामुळे तापमान पुन्हा एकदा खाली येईल. पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये 4 ते 7 फेब्रुवारी दरम्यान किमान तापमानात 3 ते 4 अंशांची घसरण होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

भारतीय हवामान विभागाने फेब्रुवारी महिन्यातील पाऊस आणि तापमानावर वर्तवलेल्या अंदाजानुसार, पंजाब आणि हरियाणातील बहुतांश भाग वगळता उत्तर भारतातील बहुतांश भागात सामान्य किंवा त्यापेक्षा कमी पाऊस पडेल.

हवामान खात्याने पुढे म्हटले की, फेब्रुवारी 2022 मध्ये ईशान्य भारताचा पूर्व भाग, दक्षिण द्वीपकल्पीय भारत आणि मध्य भारताचा आग्नेय भाग वगळता, जेथे किमान तापमान सामान्य किंवा सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. देशातील बहुतांश भागात सामान्य तापमानापेक्षा कमी तापमान नोंदवले जाऊ शकते.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -