Weather Update: आजही उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, केरळमध्ये पूर-पावसामुळे ३८ जणांचा मृत्यू; जाणून घ्या परिस्थिती

weather forecast imd predicted unseasonal rain marathwada and vidarbha issue orange and yellow alert 28 29 december
Weather Forecast : राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; विदर्भात ऑरेंज अलर्ट

भारताच्या उत्तरेपासून ते दक्षिणपर्यंत परतीच्या पावसाने कहर केला आहे. उत्तराखंडमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच पुढील २४ तास पूर्व उत्तरेस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर केरळमध्ये आज धरण उघडल्यामुळे नद्यांच्या पाण्याची पातळी वाढू शकते. केरळमधील दहा धरणांबाबत रेड अलर्ट जारी केला आहे. माहितीनुसार पूर आणि मुसळधार पावसामुळे केरळमधील आतापर्यंत ३८ जणांनी आपले प्राण गमावले आहेत.

पुढील ४८ तासांमध्ये उत्तराखंडमध्ये परिस्थिती बिघडेल

परतीच्या पावसाने दक्षिणेसह उत्तरेस देखील हाहाःकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तराखंडमध्ये पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे उत्तराखंडमधील परिस्थिती पहिल्यापेक्षाही बिघडू शकते.

नैनीतालमध्ये गेल्या २४ मध्ये १५० मिलीमीटरहून जास्त पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. पहिल्यांदाच नैनीतालमध्ये नयना देवी मंदिराच्या आतमध्ये पाणी गेले आहे. यामुळे नैनी तलावच्या येथून येजा करणाऱ्या लोकांना समस्या निर्माण होत आहेत. तसेच मुसळधार पावसामुळे नैनीतालमध्ये भूस्खलन होण्यास सुरुवात झाली आहे. देहरादून कंट्रोलरूम संपूर्ण राज्यावर नजर ठेवून आहे. मुख्यमंत्री पुष्कर धामी कंट्रोलरूममधून बचाव कार्याची पाहणी करत आहेत. उत्तराखंड परिस्थिती पाहून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यासोबत फोनवरून बातचित केली. तसेच केंद्र सरकार कोणत्याही परिस्थिती मदत करेल असे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिली आहे. सतत मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे चारधाम यात्रा रोखली आहे.

केरळमध्ये २४ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता

केरळमध्ये सतत मुसळधार पाऊस असल्यामुळे राज्य सरकारने ११ धरणांबाबत रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आशियातील सर्वात उंच असलेल्या धरणांपैकी इडुक्की धरणाचे दरवाजेही आज उघडले जाणार आहेत. २०१८मध्ये जेव्हा इडुक्की धरणाचे दरवाजे उघडले गेले, तेव्हा पेरियार नदीच्या जवळील भागातील खूप मोठी नुकसान झाले होते.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार केरळमध्ये बुधवारी पावसाचा जोर वाढणार आहे. २४ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पाऊस असणार आहे. त्यामुळे सर्व राज्य सरकारने आधीपासूनच मोठी धरणे रिकामी करण्यास सुरुवात केली आहे. चलाकुडी नदीवरील शोलयार धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. कक्की नदीवरील कक्की धरणाचे दरवाजे राज्य सरकारने उघडले आहेत. तसेच एर्णाकुलममधील इडामलयार आणि पतनमतिट्टीमधील पम्पा धरणाचे दरवाजे आज उघडले जातील. मटुपट्टी, मुझियार, कुंडला आणि पीची धरणासाठी रेड अलर्ट जारी केला गेला आहे. याशिवाय आठ धरणांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.


हेही वाचा – Attacks on Hindus in Bangladesh : बांग्लादेशमध्ये हिंदूंची घरे जाळल्याप्रकरणी ४५ संशयितांना अटक, अमेरिकेकडून हल्ल्याचा निषेध