लग्नाच्या हॉलच्या शोधात आहात; उद्योगपती आनंद महिंद्रांनी शेअर केली भन्नाट आयडीया; ऐकून व्हाल थक्क

मुंबईसह राज्यभरात आपण बरीच अशी ठिकाण पाहिली आहेत, जिथे त्यांचे स्वत:चे वेगळेपण पाहायला मिळते. काही वर्षांपूर्वी मुंबईत कॅप्सूस म्हणजेच पॉड हॉटेल सुविधा सुरू करण्यात आली आहे.

मुंबईसह राज्यभरात आपण बरीच अशी ठिकाण पाहिली आहेत, जिथे त्यांचे स्वत:चे वेगळेपण पाहायला मिळते. काही वर्षांपूर्वी मुंबईत कॅप्सूस म्हणजेच पॉड हॉटेल सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर एका ट्रकच्या मालकाने थेट आपल्या ट्रकमध्येच लग्नाचा हॉल सुरू केल्याचे समोर आले आहे. याबाबत उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. (Wedding hall in truck shared by Anand Mahindra on twitter)

ट्रकमधील लग्नाच्या हॉलचा व्हिडीओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ट्रकचा एका बाजूचा भाग कापून त्याचा फोल्डिंगचा दरवाजा केला आहे. तसेच, त्याच्या आतमध्ये त्याला जोडून लग्नाच्या हॉलमधील भाग फिट केले आहेत. हे सर्व भाग फोल्डिगचे आहेत. त्यामुळे कमी खर्चात लग्नाचा फिरता हॉल उपलब्ध होणार आहे.

अशाप्रकारे लग्नाचा हॉल तयार करणाऱ्या ट्रक मालकाला उद्योगपती आनंद महिंद्रा भेटण्यासाठी खूप इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीची जबरदस्त कल्पना आनंद महिंद्रा यांनी शेअर केली आहे. या व्यक्तीचं अक्षरशः भरभरून कौतुक केले आहे. दरम्यान, हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. इतकंच नाही तर अवघ्या 2 मिनिटांच्या या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि रिट्विट मिळाले आहेत.

“या प्रोडक्टची संकल्पना आणि डिझाइन खूप क्रिएटिव्ह आहे. हा विचार अंमलात आणणाऱ्या व्यक्तीलाही मला भेटायचे आहे. हा जुगाड केवळ दुर्गम भागात सुविधाच देत नाही तर इको फ्रेंडलीही आहे कारण अशा विवाह हॉलमुळे जास्त लोकसंख्येच्या देशातील जागा वाचते”, असे आनंद महिंद्रा यांनी व्हिडीओ शेअर करताना म्हटले.

कसा आहे या ट्रकमधील लग्नाचे मंडप

  • संपूर्ण ट्रकचे लग्नाच्या हॉलमध्ये मोडीफाय करण्यात आले आहे.
  • या लग्नमंडपात 200 लोकांची कपॅसिटी आहे.
  • लग्न मंडप दिसायला इतका सुंदर आहे, की आत गेल्यावर कुणालाही वाटणार की हा एक ट्रक आहे.

हेही वाचा – बांगलादेशमध्ये नदीत उलटली बोट; 23 जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता