घरट्रेंडिंगwedding Insurance : आता लग्नाचाही काढता येणार इन्शुरन्स, लग्न रद्द झाल्यास पैसे...

wedding Insurance : आता लग्नाचाही काढता येणार इन्शुरन्स, लग्न रद्द झाल्यास पैसे परत

Subscribe

कोरोनाचे रुग्न दिवसेंदिवस वाढत आहेत,त्याचप्रमाणे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात लग्न ठरलेल्या जोडप्यांना आणि त्यांच्या कुटूंबियांना चिंता लागली आहे. किंबहुना असेही काही जोडपे आहेत ज्यांचा विवाह सलग दोन वर्षे कोरोनामुळे रखडला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.मात्र यावर उपाय म्हणून विमा कंपन्यांची वेडिंग इन्शुरन्स पॉलिसी तुमचे आर्थिक नुकसान भरुन काढण्यास मदत होईल.

भारतात साधारणत: दिवाळीनंतर लग्नसराईला सुरुवात होते. मात्र गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जगभरात कोरोनाचा विषाणू थैमान घालत आहे. त्यामुळे लग्नसंमारंभाला विरजन लागले आहे. त्यातच आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट पुन्हा एकदा नव्याने डोके वर काढत असल्याने या लग्नसोहळ्यावर कोरोनाची टांगती तलवार कायम आहे. लग्नसोहळा म्हटलं की, लग्नाच्या सर्व तयारीची लगबग सुरु होते. हा लग्नसोहळ्याचा कार्यक्रम व्यवस्थिरित्या पार पाडण्यासाठी संपूर्ण खटाटोप करावा लागतो. ज्याप्रमाणे कोरोनाचे रुग्न दिवसेंदिवस वाढत आहेत,त्याचप्रमाणे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात लग्न ठरलेल्या जोडप्यांना आणि त्यांच्या कुटूंबियांना चिंता लागली आहे. किंबहुना असेही काही जोडपे आहेत ज्यांचा विवाह सलग दोन वर्षे कोरोनामुळे रखडला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.मात्र यावर उपाय म्हणून विमा कंपन्यांची वेडिंग इन्शुरन्स पॉलिसी तुमचे आर्थिक नुकसान भरुन काढण्यास मदत होईल. जाणून घ्या, या बचत करणाऱ्या संकल्पनेबाबत.

भारतात विवाहसोहळ्यांचा खर्च खूप जास्त असून, यामध्ये लग्न घर, चांदणी, बँड, खाण्यापिण्याचे, भेटवस्तू आणि नातेवाईकांचे प्रवास आणि राहणे अशा अनेक मोठ्या खर्चाचा समावेश आहे. यामध्येही बहुतेक गोष्टींचे अगोदरच पैसे भरावे लागतात आणि आधीच बुकिंग करावे लागते. म्हणजेच लग्नाच्या कार्यक्रमाआधीच भरपूर पैसा खर्च होतो. परदेशात लग्नाच्या खर्चासाठी विमा संरक्षण देण्याची संकल्पना आहे. परंतु भारतात ही एक नवीन संकल्पना असून कोरोनामुळे सुरु असलेल्या वेडिंगच्या लॉकडाऊनचा झाल्यामुळे खर्च वाचवण्याकरीता भारतात या संकल्पनेची मागणी अचानक वाढली आहे.देशातील ICICI Lombard General Insurance, Future Generali आणि HDFC ERGO या कंपन्या विमा संरक्षण देतात.

- Advertisement -

‘या’ परिस्थितीत विवाह विमा उपलब्ध आहे

साधारणपणे, लग्न विमा तुम्हाला वेगवेगळ्या परिस्थितीत लग्न रद्द झाल्यास लग्नाच्या खर्चाचा तोटा भरुन निघेल. लग्न विम्यामध्ये प्रामुख्याने लग्न घराचे नुकसान, चोरी किंवा अपघाती मृत्यू किंवा वधू-वरांचे अपंगत्व आणि त्यांच्या रक्ताच्या नात्यातील विवाह रद्द झाल्यामुळे होणारे नुकसान भरुन काढले जाते.भूकंप, आग किंवा अन्य कोणत्याही प्रकारे विवाह घराच्या मालमत्तेचे थेट नुकसान झाल्यास कींवा विवाहस्थळी चोरीच्या घटना घडतात. वधू आणि वर यांचा मृत्यू झाल्यास किंवा ज्यांच्या नावावर विमा उतरवला आहे किंवा  अपघातामुळे लग्नाला उपस्थित राहू न शकल्यास. या कारणामुळे विवाह रद्द केल्यावर विमा संरक्षण मिळते.

कोणत्या खर्चावर तुम्हाला विमा संरक्षण मिळते ?

तर यामध्ये कार्ड प्रिंटिंग, एखाद्या ठिकाणचे अगोदर केलेले बुकिंग, केटरर्सचे आधी केलेले बुकिंग, सजावट आणि डीजेचे  बुकिंग, हॉटेल किंवा प्रवासाचे  बुकिंग यांसारख्या प्रमुख खर्चांवर विमा संरक्षण मिळते.

- Advertisement -

कोणत्या गोष्टींवर विमा संरक्षण मिळत नाही

तुमच्या लग्नाच्या दिवशी कोणताही संप किंवा बंद असल्यास, दहशतवादी हल्ला होतो, वधू किंवा वराचे अपहरण होते. जर तुमच्या चुकीमुळे तुमची ट्रेन किंवा फ्लाइट चुकली, तुमच्या वाहनाची किंवा वाहतूक सेवेत बिघाड झाला या अशा कारणामुळे लग्न रद्द झाले, तर विमा कंपनी नुकसान भरून काढत नाही. साधारणपणे, तुम्हाला लग्नाच्या विम्यासाठी विम्याच्या रकमेच्या ०.७% ते २% इतका प्रीमियम भरावा लागतो. त्याचबरोबर लग्नाशी संबंधित जवळपास प्रत्येक छोटी माहिती विमा कंपनीला द्यावी लागते.

अशाप्रकारे मिळवा नुकसान भरपाई

लग्नाच्या विम्याचा दावा घेण्यासाठी, तुम्हाला विमा कंपनीला लग्नाशी संबंधित जवळजवळ सर्व तपशील विम्याच्या वेळीच द्यावे लागतील. तुमचे नुकसान झाल्यास, तुम्हाला तुमच्या नुकसानीची माहिती विमा कंपनीला द्यावी लागेल. चोरी झाल्यास, तुम्हाला प्रथम पोलिसांत तक्रार करावी लागते. त्यानंतर, एफआयआरची प्रत विमा कंपनीला द्यावी लागेल. जर तुमचा दावा खरा असेल तर विमा कंपनी नुकसान भरपाई देईल, अन्यथा तुम्हाला कोणतीही रक्कम परत मिळणार नाही.लग्नाचा विमा घेण्यापूर्वी हे लक्षात ठेवालग्नाच्या विम्याशी संबंधित नियम जवळपास सर्वच कंपन्यांच्या पॉलिसींमध्ये सारखेच आढळतात. पण काही वेळा वेगवेगळ्या कंपनीच्या पॉलिसीमध्ये तफावत असते. अशा परिस्थितीत, लग्नाची विमा पॉलिसी घेण्यापूर्वी, तुम्ही त्याची कागदपत्रे नीट वाचून घ्या आणि खात्री करा.


हेही वाचा – Gond Ke Laddu: ‘गोंद के लड्डू’ साध्या मानवी भावनांची कथा आहे – नीना कुळकर्णी


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -