घरCORONA UPDATEलॉकडाऊन असतानाही असा केला प्रीतने नीतशी विवाह

लॉकडाऊन असतानाही असा केला प्रीतने नीतशी विवाह

Subscribe

मुंबईत राहणार प्रीत सिंग याने ४ एप्रिल रोजी दिल्लीतील नीत कौर हिच्याशी व्हिडिओ कॉलिंगवर लग्न केले. यावेळी दोन्ही कुटुंबियांसमवेत त्यांचे मित्रपरिवारदेखील व्हिडिओ कॉलवर जोडले गेले होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळे लोकांना स्थलांतर करणे तर दूरच एकमेकांच्या घरीदेखील जाणे कठिण झाले आहे. शिवाय सोशल डिस्टन्सिंगचा नियमही पाळायचा आहे. अशा परिस्थितीत कोणी विवाहसोहळा आयोजित करण्याचा विचारही करू शकत नाही. परंतू लॉकडाऊन असतानाही मुंबईतील मुलाने चक्क दिल्लीतील मुलीशी लग्नगाठ बांधली आहे. मुंबईत राहणार प्रीत सिंग याने ४ एप्रिल रोजी दिल्लीतील नीत कौर हिच्याशी व्हिडिओ कॉलिंगवर लग्न केले. यावेळी दोन्ही कुटुंबियांसमवेत त्यांचे मित्रपरिवारदेखील व्हिडिओ कॉलवर जोडले गेले होते.

हेही वाचा – Coronavirus : डोक्यातील उवा मारण्याच्या औषधाने कोरोना विषाणूचा नायनाट; संशोधकांचा दावा

- Advertisement -

असे पार पडले लग्न 

मुंबईतील २९ वर्षीय मर्चंड नेव्ही ऑफिसर प्रीत सिंग याने दिल्लीतील नीत कौर हिच्याशी शनिवारी लग्नगाठ बांधली. मात्र हा नेहमीसारखा लग्नसोहळा नव्हता. यात दोघांनीही लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून आपापल्या शहरातून हा विवाह संपन्न केला. हा लग्नसोहळा व्हिडिओ कॉलिंगवर पार पडला. दोघांनी दोन्ही कुटुंबियांच्या आशिर्वादाने एकमेकांना जीवनसाथी म्हणून स्विकारले. या लग्न सोहळ्यात मुंबई, दिल्लीसह दुबई, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियावरूनही मित्रपरिवार व्हिडिओ कॉलवर जोडले गेले होते. लग्न झाल्यावर कुटुंबियांनी डान्स करून आनंद साजरा केला. तर लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर नीत ही प्रीतसोबत राहण्याकरता येणार असल्याचे प्रीतने सांगितले.

यावर प्रीतची प्रतिक्रिया 

गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही आमच्या लग्नाचे प्लॅनिंग करत आहोत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे आमची घोर निराशा झाली होती. परंतू प्रत्येक समस्येवर समाधान हे असतेच. त्यामुळे आम्ही व्हिडिओ कॉलचा पर्याय निवडला, अशी प्रतिक्रिया प्रीतने दिली. प्रीतची बॅचलर पार्टी गोव्यात होणार होती. ती रद्द झाली असून प्रीत आणि नीतचा श्रीलंकेतील हनिमून प्लॅन पुढे ढकलण्यात आला आहे, असेही प्रीतने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -