घरदेश-विदेश'हे' आहेत जगातील विचित्र Jobs

‘हे’ आहेत जगातील विचित्र Jobs

Subscribe

नेहमीच आपण नोकरीमुळे चिंतेत असतो. कारण नोकरी कशी असेल, खरंत आपण त्यामध्ये काम करु शकतो का असे विविध प्रश्न हे बहुतांश जणांच्या मनात उपस्थितीत होतात. परंतु आम्ही तुम्हाला जगातील अशा काही विचित्र नोकऱ्यांबद्दल सांगणार आहोत ज्याबद्दल ऐकून तुम्ही हैराण व्हाल.

-प्रोफेशनल स्लीपर

- Advertisement -


आपण बऱ्याच वेळा एकमेकांना असे बोलतो की, तू किती वेळ झोपतो, याचे तुला पैसे मिळतात का? परंतु हे खरं आहे. प्रोफेशनल स्लीपर हा सुद्धा एक प्रकारचा जॉब आहे.

-डियोडरेंट टेस्टर

- Advertisement -


डियोडरेंट किती असरदार आहे हे तपासून पाहण्यासाठी सुद्धा लोकांना नोकरीवर ठेवले जाते. या जॉबमध्ये तुम्हाला त्या डिओचा सुवास खरंच दीर्घकाळ शरिरावर टिकतो का हे सांगायचे असते.

-वॉटर स्लाइड टेस्टर


वॉटर स्लाइडर टेस्टर असा एक जॉब आहे जेथे तुम्हाला स्लाइड करायची असते. त्याचवेळी हे सुद्धा पहावे लागते की, वॉटर स्लाइडर किती सुरक्षित आहे.

-बियर टेस्टिंग


बियअर पिण्यासाठी जर तुम्हाला पैसे दिले तर तुम्ही काय कराल? खरंतर बहुतांशजण यासाठी होकारच देतील. पण हा सुद्धा एक जॉबच आहे. येथे तुम्हाला बिअरची चव घ्यायची असते.

-रेंटल बॉयफ्रेंड


जर तुम्हाला एकटे वाटत असेल तर ही सुद्धा गरज पूर्ण होणार आहे. कारण आजकाल रेंटल बॉयफ्रेंड सुद्धा मिळतात. टोक्यो मध्ये पैसे देऊन बॉयफ्रेंड खरेदी करु शकता.

-पॅसेंजर पुशर


लंडनमध्ये पॅसेंजर पुशरची नोकरी असते. यामध्ये मेट्रो मध्ये झालेल्या गर्दीला आतमध्ये ढकलण्याचे काम पॅसेंजर पुशर करतात.

 


हेही वाचा: नववर नव्हे तर चक्क ‘या’ जमातीतील वडिलच करतात लेकीशी लग्न

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -