आफ्रिकेच्या सेनेगलमधील हॉस्पिटलमध्ये भीषण आग दुर्घटना; 11 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू

west africa senegal accident massive fire broke out tiwaune hospital 11 newborns died
आफ्रिकेच्या सेनेगलमधील हॉस्पिटलमध्ये भीषण आग दुर्घटना; 11 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू

आफ्रिकेतील सेनेगल या शहरात भीषण आगीची घटना घडली आहे. सेनेगलच्या (Senegalese) तिवौने शहरातील एका रुग्णालयात लागलेल्या आगीत 11 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती सेनेगलचे अध्यक्ष मॅकी सॅल यांनी दिली आहे. (Newborn Babies Died)

सेनेगलच्या तिवौने शहारातील हॉस्पीटलमध्ये भीषण आगीच्या दुर्घटनेतील मृत्यूमुळे शहरात शोककळा पसरली आहे. यावर अध्यक्ष मॅकी सॅल म्हणाले की “मी नुकतीच एक अतिशय दुःखद आणि निराश करणारी बातमी ऐकली. तिवौने येथील एका सरकारी रुग्णालयातील नवजात शिशु विभागात लागलेल्या आगीत 11 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीत मृत्यू झालेल्या बालकांच्या माता आणि कुटुंबियांप्रती मी मनापासून सहानुभूती व्यक्त करतो. (Hospital Fire)

सेनेगाली राजकारणी डिओप सी यांच्या म्हणण्यानुसार, तिवौनेच्या वाहतूक केंद्रातील मामे अब्दु अझीझ सी दबाख हॉस्पिटलमध्ये ही भीषण घडला घडली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र आगीच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. आग कुठून लागली याचा शोध घेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

सेनेगलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी आग आहे. गेल्या वर्षीही सेनेगलमधील एका रुग्णालयाच्या नवजात शिशु वॉर्डमध्ये आग लागली होती, ज्यामध्ये चार मुलांचा मृत्यू झाला होता.


Mumbai Road Accident : मुंबईतील जवळपास निम्मे रस्ते अपघात दुचाकी वाहनांमुळेच, रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा