Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश बंगालमध्ये भाजपचा रडीचा डाव; शरद पवार संतापले

बंगालमध्ये भाजपचा रडीचा डाव; शरद पवार संतापले

Related Story

- Advertisement -

संपूर्ण देशाचं ज्या राज्याच्या निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागून होतं त्या पश्चिम बंगालचा निकाल समोर आला आहे. यामध्ये तृणमूल काँग्रेसला बहुमत मिळालं आहे. मात्र, पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला आहे. यावरुन आता वाद होण्याची शक्यता आहे. कारण सुरुवातीला ममता बॅनर्जी यांना विजयी घोषित करण्यात आलं. परंतु काही वेळाने ममता बॅनर्जी या पराभूत झाल्याचं घोषित केलं. यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. बंगालमध्ये भाजप रडीचा डाव खेळत असल्याचं शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांनी एक ट्विट केलं आहे. “बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठिंबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला ‘रडीचा डाव’ एवढंच म्हणता येईल अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

- Advertisement -

ममता बॅनर्जी कोर्टात जाणार

मी निकाल मान्य करते. पण निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काहीतरी छेडछाड करण्यात आल्याची माहिती माझ्याकडे असून याविरोधात कोर्टात जाणार आहे. मी सत्य समोर आणणार, असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

ममता बॅनर्जींचा पराभव झाल्याचा भाजपाचा दावा

एकीकडे तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालेलं असताना दुसरीकडे ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राममध्ये पराभव झाल्याचा भाजपाचा दावा आहे. भाजपाचे सुवेंदू अधिकारी यांनी १६२२ मतांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केला असं ट्विट भाजपा नेते अमित मालवीय यांनी केलं आहे. भाजपा नेते अमित मालवीय यांनी ममता बॅनर्जी यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा नैतिक हक्क नसल्याचं म्हटलं आहे.

भाजपला पराभूत केल्याचा मला आनंद – राहुल गांधी

राहुल गांधी यांनी ट्विट करत ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचं अभिनंदन केलं आहे. भाजपचा पराभव केल्यामुळे मला ममताजी आणि तृणमूल काँग्रेसचं अभिनंदन करायला आनंद होत आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -