Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी West Bengal Election 2021: असदुद्दीन ओवेसींच्या सगळ्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

West Bengal Election 2021: असदुद्दीन ओवेसींच्या सगळ्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

Related Story

- Advertisement -

पश्चिम बंगालमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून विधानसभा निवडणूक २०२१ची मतमोजणी सुरू आहे. दरम्यान बिहारच्या माध्यमातून पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत राजकीय मार्गाचा शोध घेण्यासाठी गेलेल्या एआयएमआयएम अध्यक्ष असदुद्दीने ओवेसींचे स्वप्न भंग झाली आहेत. फुरफुरा शरीफच्या पीरजादा अब्बास सिद्दीकी यांच्या झटक्यानंतर ओवेसींना बंगालमधील मुस्लिम मतदारांचा पाठिंबा देखील मिळालेला नाही आहे. मुस्लिम मतदारांनी ओवेसींपेक्षा ममता बॅनर्जींना साथ दिली आहे. बंगालमधील सात जागांवरील असुद्दीन ओवेसींच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले असून एकही जागा मिळू शकली नाही आहे.

बंगालच्या ७ विधानसभा जागांवर ओवेसी यांनी आपले उमेदवार उभे केले होते. एआयएमआयएमच्या तिकिटावर इतहारच्या जागेवर मोफाककर इस्लाम, जलांगी जागेवर अलसोकत जामन, सागर्दीघीच्या जागेवर नूरे महबूब आलम, भरतपूर जागेवर सज्जाद हुसैन, मालतीपुर जावेर मौलान मोतिउर रहमान, रतुओ जागेवर सईदुर रहमान आणि आसनसोल उत्तर जागेवर दानिश अजीज मैदानात उतरले होते.

- Advertisement -

असदुद्दीन ओवेसी यांनी ज्या सात जागांवर उमेदवार उतरवले होते, त्यापैकी एकही जागा त्यांना मिळाली नाही. एआयएमआयएमने बिहारच्या धर्तीवर बंगालमधील मुस्लिमबहुल जागांवर लक्ष केंद्रित केले, परंतु बिहारप्रमाणे त्यांना मुस्लिमांची मने जिंकता आली नाहीत. ओवेसी यांनी मुस्लिम उमेदवारांना उतरवून बंगालमध्ये खाते उघडण्याचे स्वप्न पाहिले होते, परंतु त्यांचे सर्व समीकरण ममता बॅनर्जी यांनी पाडले.


हेही वाचा – West Bengal Election 2021 : नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींचा विजय


- Advertisement -

 

- Advertisement -