घरताज्या घडामोडीपश्चिम बंगाल निवडणूक प्रचार ठरला कोरोना विस्फोटास कारणीभूत, मृत्यूदरात मोठी वाढ!

पश्चिम बंगाल निवडणूक प्रचार ठरला कोरोना विस्फोटास कारणीभूत, मृत्यूदरात मोठी वाढ!

Subscribe

देशात कोरोना विषाणूचा फैलाव झपाट्याने पसरत आहे. अशा परिस्थितीत पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूक होत आहेत. या निवडणुकी दरम्यान कुठेतरी कोरोनाचा विसर पडल्याचे चित्र दिसत आहे. पश्चिम बंगालमधील राजकीय पक्ष तृणमूल काँग्रेस (TMC), भारतीय जनता पक्ष (BJP), काँग्रेस (Congress) आणि इतर डावे पक्ष जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. सभा, रॅली, रोड शोसाठी लाखोच्या संख्येने लोक गर्दी करत कोरोनाचे नियम पायदळी तुडवत आहेत. पण हेच निवडणूक प्रचार पश्चिम बंगालला महागात पडणार आहेत. पश्चिम बंगालमधील मृत्यूदर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सोमवारी बंगालमध्ये आतापर्यंत सर्वाधिक रुग्णवाढ झाली असून ४ हजार ५११ रुग्णांची नोंद झाली. तर मृत्यूदर १.७ झाला असून हा दर महाराष्ट्र इतकाच आहे.

देशातील सर्वाधिक मृत्यूदर पंजाब आणि सिक्कीममध्ये आहे. गेल्या सात दिवसांच्या आकडेवारीनुसार, बंगालमध्ये दिवसाला ३ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत होती. तर बिहारमध्ये २ हजारांहून, झारखंडमध्ये १ हजारांहून आणि ओडिसामध्ये नऊशेहून अधिक रुग्णांची नोंद होत होती. तसेच आसाममध्ये दोनहून अधिक रुग्णांचा वाढ होत असून बंगालच्या तुलनेत ही संख्या १० टक्के इतकी आहे. कोरोना रुग्णवाढीमध्ये देशात पश्चिम बंगाल सातव्या क्रमांकावर आहे. सध्या बंगालमधील पॉझिटिव्ही रेट ६.५ टक्के इतका आहे.

- Advertisement -

कोविड-१९ इंडिया ट्रॅकरनुसार, सध्या पश्चिम बंगालमधील कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख १९ हजार ४०७वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १० हजार ४१४ जणांचा मृत्यू झाला असून ५ लाख ८२ हजार ४६२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या २६ हजार ५३१ जणांवर उपचार सुरू आहे.


हेही वाचा – अजब! ओडिशात जन्मली तीन हात, दोन डोकं असणारी जुळी बाळं

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -