
AITC Twitter Account Hacked: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे ट्विटर अकाऊंट मंगळवारी सकाळी हॅक करण्यात आले. हॅकर्सनी अकाउंटचे नाव आणि डीपी बदलला आहे. पक्षाच्या मुख्य अधिकृत ट्विटर अकाऊंटचा लोगो आणि नाव बदलल्याचे आढळून आले आहे. अकाऊंटचे नाव ‘युग लॅब्स’ असं बदललेलं दिसत आहे.
तसंच पक्षाचा बदललेला लोगो ‘Y’ आकारात काळ्या फॉन्टमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे, ट्विटर अकाऊंटवर कोणतीही विशिष्ट आक्षेपार्ह, अपमानास्पद किंवा टीएमसी विरोधी पोस्ट शेअर केलेली नाही. मात्र, हॅकर्सनी ट्विटर हँडलचा बायो बदललेला आहे. यामध्ये लिहिले आहे की, ‘ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसचे अधिकृत ट्विटर हँडल. ईमेल: [email protected]’. ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याच्या वृत्तावर पक्षाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही.
अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसची स्थापना १ जानेवारी १९९८ रोजी ममता बॅनर्जी यांनी केली. त्यांनी पक्षाचे नेतृत्व केले आणि २०११ मध्ये पश्चिम बंगालमधील डावे सरकार उलथून टाकले. टीएमसीचे नंदीग्राम आंदोलन पक्षासाठी टर्निंग पॉइंट ठरले. या आंदोलनानंतर डाव्या पक्षाकडून सत्ता बळकावण्यात पक्षाला यश मिळाले.
All India Trinamool Congress’ Twitter account appears to be hacked. pic.twitter.com/wyE417xG0c
— ANI (@ANI) February 28, 2023
युग लॅब ही यूएस-आधारित ब्लॉकचेन तंत्रज्ञान कंपनी आहे जी NFTs आणि डिजिटल संग्रहण विकसित करते. हे क्रिप्टोकरन्सी आणि डिजिटल मीडियामध्ये काम करते. गेल्या वर्षी १० डिसेंबर रोजी वायएसआर काँग्रेसचे सुद्धा अधिकृत ट्विटर अकाऊंट हॅक झाले होते. या ट्विटर अकाऊंटवरून क्रिप्टो-चलनाचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला. पक्षाचे ट्विटर बायोस्क्रिप्शन NFT Millionaire मध्ये बदलले गेले आणि डिस्प्ले फोटो Bored Ape Yacht Club (BAYC) कलेक्शनमधील फोटोमध्ये बदलला गेला.