पश्चिम बंगालमध्ये ईडीची छापेमारी, ममतांच्या निकटवर्तीयाकडून तब्बल 20 कोटी जप्त

west bengal ed raids on 13 location in teacher recruitment scam questioned partha chatterjee till late night

शिक्षण भरती घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शुक्रवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्तींच्या 13 ठिकाणांवर छापेमारी केली आहे. यावेळी निकटवर्तीच्या घरातून सुमारे 20 कोटींची रोकड जप्त केली आहे. पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री पार्थ चटर्जी यांचे निकटवर्तीय असलेल्या अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून ही रोकड ईडीने जप्त केली आहे. ही रोकड इतक्या मोठ्याप्रमाणात होती की ईडीने बँकेचे अधिकारी बोलावले आहे. याशिवाय कारवाईत ईडीने अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून रोकडसह जवळपास 20 मोबाईल जप्त केले आहेत.

ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात पार्थ चटर्जी सध्या उद्योग आणि वाणिज्य मंत्री आहेत. हा कथित घोटाळा झाला तेव्हा ते शिक्षण मंत्री होते. सीबीआयने त्यांची याप्रकरणी दोनदा चौकशी केली. याच चटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता चटर्जी यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली. यावेळी ईडीने 20 कोटी रुपयांची रोकड आणि 20 मोबाईल जप्त केले. ही जप्त केलेली रक्कम आणि मोबाईल स्कूल सर्व्हिस कमिशन घोटाळ्याशी संबंधित असल्याचा ईडीला संशय आहे. दरम्यान अर्पिता चटर्जी यांच्याशिवाय ईडीने शिक्षण राज्यमंत्री परेश सी अधिकारी तसेच आमदार माणिक भट्टाचार्य तसेच अन्य काही व्यक्तींवरही कारवाई केल्याची माहिती समोर येतेय. परेश चंद्र अधिकारी यांच्या कूचबिहार जिल्ह्यातील मेखलीगंज येथील निवासस्थानांवर छापे टाकले. ईडीची ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

या कारवाईचे जे चित्र समोर आले आहे त्यात 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांचा मोठा डोंगर पाहायला मिळत आहे. रिपोर्ट्सनुसार, अर्पिता व्यतिरिक्त ईडीने इतर अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. या यादीत मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्यासह माणिक भट्टाचार्य, आलोक कुमार सरकार, कल्याण मोय गांगुली यांसारख्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे.

नेमक प्रकरण काय?

पश्चिम बंगालमधील सरकारी आणि अनुदानित शाळांमधील उच्च प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील शिक्षकांच्या भरती प्रक्रियेत बेकायदेशीर नियुक्त्या करण्यात आल्या, आरोप होत आहे. हे प्रकरण न्यायालयात पोहचले असून आता कोलकाता उच्च न्यायालयाने सीबीआय मार्फत या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिलेत.

हा तर फक्त ट्रेलर आहे…भाजपचं टीकास्त्र

बंगालमधील भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनीही यासंदर्भात ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नोटांच्या ढिगाऱ्याचा फोटो शेअर केला आहे. सुवेंदू अधिकारी यांनी ट्विटमध्ये लिहिले की, एसएससी घोटाळ्याप्रकरणी पश्चिम बंगालचे शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या जवळच्या सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून ईडीने 20 कोटी रुपये रोख जप्त केली आहे. राज्य सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचे राष्ट्रीय बोधचिन्ह असलेल्या पाकिटांमध्ये रोख रक्कम सापडली असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. त्यानंतर सुवेंदू अधिकारी यांनी आणखी दोन ट्विट केले, त्यापैकी एका ट्विटमध्ये त्यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा अर्पिता मुखर्जीसोबतचा फोटो शेअर केला. त्याचवेळी त्यानंतरच्या ट्विटमध्ये त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करत म्हटले की, हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर येणे बाकी आहे.


मुंबई लवकरच खड्डेमुक्त होणार, नव्या तंत्रज्ञानांची चाचपणी