घरताज्या घडामोडीममता बॅनर्जी विरुद्ध सुवेंदू अधिकारी लढणार; भाजपची ५७ जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर

ममता बॅनर्जी विरुद्ध सुवेंदू अधिकारी लढणार; भाजपची ५७ जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर

Subscribe

पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. तृणमुल काँग्रेसनंतर आता भाजपने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने ५७ जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. त्यानुसार नंदीग्राममधून सुवेंदू अधिकारी यांना उमेदवारी दिली असून ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात लढणार आहेत.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डी यांनी बंगालच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केल्यानंतर उमेदवारांच्या नावांबाबत त्यांनी अंतिम निर्णय घेतला. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करताना भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह म्हणाले की, ‘सुवेंदू अधिकारी नंदीग्राम सीटवरुन पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढवतील.’

- Advertisement -

याआधी शुक्रवारी (५ मार्च) तृणमूल काँग्रेस अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी २९१ जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली होती. ममता बॅनर्जी या स्वतः नंदीग्राममधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून त्या भवानीपूर मतदारसंघातून निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भवानीपूर या मतदारसंघातून तृणमूल नेत सोवन चटर्जी लढणार आहेत. तर माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीसुद्धा शिवपूर येथून निवडणूक लढवणार आहेत.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात निवडणुका घेण्यात येणार आहे. २७ मार्च, १ एप्रिल, ६ एप्रिल, १० एप्रिल, १७ एप्रिल, २२ एप्रिल, २६ आणि २८ एप्रिल रोजी मतदान होईल, तर मतमोजणी २ मे रोजी होईल. तसेच पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील अधिसूचना निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात बंगालमध्ये चार जिल्ह्यातील ३० विधानसभेच्या जागेवर मतदान होईल. यामध्ये बांकुडा, दक्षिण २४ परगना शिवाय पूर्ण आणि पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्याचा समावेश आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पश्चिम बंगालच्या निवडणुकांचे वेळापत्रक मोदी, शहांनी दिले काय ? ममता दीदींचा सवाल


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -