तृणमूलला जिंकून देण्यासाठी ममतांनी मागितली मदत – भाजप नेता

west bengal election 2021 mamata banerjee nandigram suvendu adhikari aide election campaign
तृणमूलला जिंकून देण्यासाठी ममतांनी मागितली मदत - भाजप नेता

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली आहे. या पहिल्या टप्प्यात ३० जागांसाठी मतदान होत आहे. यादरम्यानच नंदीग्राममधील भारतीय जनता पक्ष (BJP) नेते प्रलय पाल यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. प्रलाय पाल म्हणाले की, ‘मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मला फोन केला होता आणि नंदीग्राममधून तृणमूल काँग्रेसला जिंकून देण्यासाठी मदत करण्यास सांगितले होते. जिथे त्यांच्या विरोधात भाजपचे सुवेंदू अधिकारी मैदानात उतरले आहेत.’

भाजपकडून एक व्हिडिओ प्रसारित केला आहे, त्यामध्ये प्रलय पाल यांनी हा दावा केला आहे. ते म्हणाले की, ‘शनिवारी सकाळी ममता बनर्जी यांनी त्यांना फोन केला होता आणि नंदीग्रामध्ये टीएमसीसाठी मदत मागितली होती.’ पण टीएमसीने भाजप नेत्याने केलेला हा दावा फेटाळून लावला आहे. टीएमसीने सांगितले आहे की, ‘ऑडिओमध्ये ऐकू येत असलेला आवाज वॅरिफाइड नाही आहे. ऑडिओ क्लिप देखील वॅरिफाइड देखील नाही आहे.’

प्रलय पाल यांनी सांगितले की, ‘ममता बॅनर्जी यांची इच्छा होती की, मी त्यांच्याकडे काम करावे आणि टीएमसीमध्ये परत यावे. परंतु मी बऱ्याच काळापासून सुवेंदू अधिकारी आणि अधिकारी कुटुंबासोबत जोडलेला आहे. मी आता भारतीय जनता पक्षासोबत काम करत आहे. डाव्या राजवटीत जेव्हा माकप सत्तेत होते, तेव्हा नंदीग्राममधील लोकांना अत्याचारांपासून वाचवण्यासाठी उभे असलेले अधिकारी कुटुंब होते. मी कधीच अधिकारी कुटुंबाविरोधात गेलो नाही आणि कधीच मी अशी हिंमत करणार नाही.’


हेही वाचा – West Bengal Assembly Election 2021: मतदानाच्या पहिल्याच टप्प्याला हिंसक वळण; भाजप कार्यकर्त्याची हत्या!