घरताज्या घडामोडीममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील मंत्री 'पार्थ चॅटर्जी' यांना ईडीकडून अटक

ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील मंत्री ‘पार्थ चॅटर्जी’ यांना ईडीकडून अटक

Subscribe

पश्चिम बंगालमधील ममता दीदींच्या सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांना शिक्षक भरती घोटाळाप्रकरणी ईडीने अटक केली आहे.

सध्या देशभरात ईडीने जोरदार कारवाई सुरू केली असून महाराष्ट्रानंतर आता ईडीने आपला मोर्चा पश्चिम बंगालकडे वळवला आहे. पश्चिम बंगालमधील ममता दीदींच्या सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांना शिक्षक भरती घोटाळाप्रकरणी ईडीने अटक केली आहे. त्याचबरोबर चॅटर्जी यांच्या निकटवर्तींयाकडून कोट्यवधी रुपयांच्या रोख रक्कमेसह सोनेही जप्त करण्यात आले आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून शिक्षक भरती घोटाळाप्रकरणी ईडीकडून पार्थ चॅटर्जी यांची  चौकशी सुरू होती. चॅटर्जी यांच्या घरावरही ईडीने छापा मारला. पण त्यात फारसे काही सापडले नाही. मात्र चौकशीदरम्यान चॅटर्जी यांची जवळची सहकारी अर्पिता यांच्याघरावरही ईडीने छापा मारला असता त्यात २० कोटींहून अधिक रक्कम आणि महत्वाचे दस्तावेज जप्त करण्यात आले. यादरम्यान चॅटर्जी यांना ईडीच्या प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. तसेच उत्पन्नाचे स्त्रोतही दाखवण्यात आले नाही. त्यानंतर ईडीने त्यांना अटक केली.

नेमके काय आहे प्रकरण

- Advertisement -

पार्थ चॅटर्जी यांच्यावरील ईडी कारवाईचा थेट संबंध हा २०१६ मधील शिक्षक भरतीमध्ये झालेल्या घोटाळ्याशी आहे. या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये पद्धतीने नापास उमेदवारांना प्रवेश देण्यात आले होते. त्यासाठी ओएमआर शीटमध्ये फेरफार करण्यात आला. यासाठी लाखो रुपयांची लाच घेण्यात आल्याचा आरोप आहे. यात थेट शिक्षणमंत्र्याचाच सहभाग होता. यासाठी त्यांना अजून काही मंत्र्यांचीही साथ होती असेही ईडीच्या माहितीतून समोर आले आहे. यामुळे चॅटर्जींनंतर ममता  सरकारमधील अजून काही मंत्र्यांवर अटकेची तलवार लटकली आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -