पश्चिम बंगालमध्ये होलिका दहनसाठी रात्रीच्या कर्फ्यूमधून मिळणार सूट, सरकारकडून नोटीस जारी

West Bengal relaxes night curfew for Holi eve on 17 March 2022
पश्चिम बंगालमध्ये होलिका दहनसाठी रात्रीच्या कर्फ्यूमधून मिळणार सूट, सरकारकडून नोटीस जारी

मागील काही महिन्यांपासून देशात कोरोनाच्या केसेसमध्ये घट होताना दिसत आहे. परंतु कोरोना पूर्णपणे नष्ट झालेला नाही. त्यामुळे अजूनही सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. आता सणांना सुरुवात होणार आहे. यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते. त्यामुळे पश्चिम बंगालसह काही राज्यांमध्ये अजूनही रात्रीचा कर्फ्यू आहे. पण होळीच्या दृष्टीकोनातून पश्चिम बंगाल सरकारने एक नोटीस जारी केली आहे.

बंगाल सरकारने नोटीस जारी करून सांगितले की, 17 मार्च 2022 रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत असलेला कर्फ्यू शिथिल केला जाणार आहे. कारण होलिका दहनचा उत्सव नेहमीप्रमाणे साजरा करता यावा.

दरम्यान पश्चिम बंगाल सरकारने 14 फेब्रुवारीला रात्रीच्या कर्फ्यूच्या कालावधीमधील घट केली होती. एक तासाचा कालावधी कमी करून रात्री 12 वाजल्यापासून ते सकाळी 5 वाजेपर्यंतचा कर्फ्यू निश्चित करण्यात आला. पण रात्रीच्या कर्फ्यूमधून पश्चिम बंगालमधील नागरिकांना तुर्तास दिलासा मिळणार आहे. 17 मार्चला होलिका दहन निमित्ताने रात्रीच्या कर्फ्यूमध्ये शिथिलता दिली गेली आहे.

बुधवारी पश्चिम बंगालमध्ये 114 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. पश्चिम बंगालमधील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 20 लाखांहून अधिक आहे. आतापर्यंत 21 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – निवडणुका संपल्या; आता 31 मार्चपासून बंद होणार मोफत धान्य वाटप योजना?