घरताज्या घडामोडीधक्कादायक! कोरोनामुळे वडिलांचे निधन, मृतदेह पाहण्याचे मागितले ५१ हजार

धक्कादायक! कोरोनामुळे वडिलांचे निधन, मृतदेह पाहण्याचे मागितले ५१ हजार

Subscribe

पश्चिम बंगाल येथे कोरोनामुळे निधन झालेल्या वडिलांचा मृतदेह पाहण्यासाठी मुलाकडून तब्बल ५१ हजार रुपये मागितल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

कोरोना विषाणूच्या नावाखाली लूटमार सुरु असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळत आहेत. त्यातच एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. पश्चिम बंगाल येथे कोरोनामुळे निधन झालेल्या वडिलांचा मृतदेह पाहण्यासाठी मुलाकडून तब्बल ५१ हजार रुपये मागितल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नेमके काय घडले?

पश्चिम बंगाल येथे राहणाऱ्या हरि गुप्ता या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्यांचा शनिवारी मध्यरात्री कोरोनामुळे मृत्यू झाला. पण, रुग्णालयाने त्यांना कळवले नाही. हरि गुप्ता यांचा मुलगा सागर यांनी सांगितले की, ‘रविवारी आम्हाला दुपारी रुग्णालयातून फोन आला आणि वडिलांचे मध्यरात्री निधन झाले असे सांगितले. हे तेव्हाच कळवले नाही, असे मी त्यांना विचारले. त्यावर त्यांनी तुमचा नंबर नसल्याचे कारण दिले.’

- Advertisement -

त्यानंतर हरि गुप्ता यांचे कुटुंब रुग्णालयात आले. त्यावेळी त्यांना मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेऊन गेल्याचे सांगण्यात आले. कुटुंबिय शिबपूर स्मशानभूमीत पोहोचले. तेव्हा त्यांच्याकडे मृतदेह पाहण्यासाठी तब्बल ५१ हजार रुपयाची मागणी केली. कुटुंबियांच्या विनंतीनंतर ही रक्कम ३१ हजारांनी कमी करण्यात आली. तरीही कुटुंबियांनी रक्कम देण्यास नकार दिला आणि त्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांचीही विनंती त्यांनी ऐकली नाही, असा दावा कुटुंबियांकडून करण्यात आला. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेरात कैद करण्याचा कुटुंबियातील काही सदस्यांनी प्रयत्न केला. परंतु, त्यांचे फोनही हिस्कावून घेण्यात आले. अखेर मृतदेहाचे तोंड न पाहताच कुटुंबियांना माघारी परतावे लागले.

दरम्यान, कुटुंबियांच्या सदस्याचा फोन नंबर न मिळाल्याने मृतदेह अंत्यसंस्कारासाठी पाठवण्यात आलाचा दावा केला आहे. मात्र, या विरोधात कुटुंबियांनी पोलीस चौकीत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Kerala Plane Crash : सहवैमानिकाचा मृतदेह पाहून गरोदर पत्नीची शुद्ध हरपली


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -