घरताज्या घडामोडीबिहारच्या पश्चिम चंपारणतील योगापट्टीत अंदाधुंद गोळीबार; प्रभाग सदस्यासह 4 जण जखमी

बिहारच्या पश्चिम चंपारणतील योगापट्टीत अंदाधुंद गोळीबार; प्रभाग सदस्यासह 4 जण जखमी

Subscribe

योगापट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोलाघाट डुमरी अहिरोली गावात गुरुवारी पहाटे अज्ञातांनी अंदाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या गोळाबारात प्रभाग सदस्यासह 4 जण जखमी झाले आहेत.

योगापट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोलाघाट डुमरी अहिरोली गावात गुरुवारी पहाटे अज्ञातांनी अंदाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या गोळाबारात प्रभाग सदस्यासह 4 जण जखमी झाले आहेत. जखमींवर बेतिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गावकऱ्यांनी पिस्तूलसह गुन्हेगाराला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. योगपट्टी पोलीस त्याची चौकशी करत आहेत. (west champaran indiscriminate firing in yoga Patti of west champaran four including ward member were shot)

या घटनेत डुमरी पंचायतीचे प्रभाग सदस्य राजा बाबू पटेल, त्यांचा भाऊ विजयकुमार पटेल आणि ग्रामस्थ सुधन मांझी आणि रुस्तम मियाँ जखमी झाले. राजा बाबू पटेल यांना गोळी लागली आहे.

- Advertisement -

याप्रकरणी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या राजा बाबू पटेल याची चौकशी केली असता, “भावांसोबत घराच्या दारात बसले होते. त्यावेळी चेहऱ्या मास्क घालून एक अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून आला. तो येताच त्याच्यावर गोळीबार केला. त्यामुळे गोळी त्याच्या मानेला लागली. हे पाहून लोक त्याला पकडण्यासाठी धावले. त्यानंतर गुन्हेगाराने गावकऱ्यांवरही 3 गोळ्या झाडल्या”, राजा बाबू पटेल यांनी सांगितले.

या अंदाधुंद गोळीबारात इतर लोकांनाही गोळ्या लागल्याचे समजते. गोळीबार करत त्याठिकाणाहून गुन्हेगाराने पळ काढला. त्यानंतर गावकऱ्यांनीही त्याच्या पाठलाग केला. मात्र आरोपी पळ काढून एका शेतात गेला. यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती देऊन त्याला चारही बाजूंनी घेरले. बऱ्याच प्रयत्नानंतर गावकऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

- Advertisement -

या घटनेत अन्य गुन्हेगारांचा सहभाग असण्याच्या अपेक्षेने ग्रामस्थांनी उसाच्या शेताला घेराव घातला आहे. गावकरी उसाच्या शेतात गुन्हेगारांचा शोध घेत आहेत. एसडीपीओ मुकुल परिमल पांडे म्हणाले की, गुन्हेगाराने गोळीबार केल्याची माहिती आहे. स्थानिक पोलीस घटनास्थळी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.


हेही वाचा – गोव्याहून येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाचे हैदराबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -