बृजभूषण सिंह यांनी कुस्तीपटूंविरोधात याचिका केली दाखल, विनेशसह अनेकांवर केले गंभीर आरोप

Wfi chief brijbhushan singh files plea against wrestlers vinesh phogat and others

भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळ, मानसिक त्रास दिल्याच्या आरोप करणाऱ्या कुस्तीपटूंविरोधातच आता त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. बृजभूषण सिंह यांनी या याचिकेतून विनेश फोगाट, साक्षी मलिकसह अनेक कुस्तीपटूंविरोधात गंभीर आरोप केले आहेत. कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांविरोधात ही याचिका आहे.

या याचिकेतून त्यांनी म्हटलं की, कुस्तीपटूंनी लैंगिक छळ कायद्याचा गैरवापर करत न्यायव्यवस्थेची खिल्ली उडवली आहे. कोणत्याही कुस्तीपटूवर लैंगिक अत्याचार झाला असेल तर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करत न्यायालय आणि कायदेशीर प्रक्रियेद्वारे न्यायाची मागणी केली पाहिजे होती. याचिकेत विनेश फोगट, बजरंग पुनिया यांच्यासह अनेक कुस्तीपटूंविरोधात FIR नोंदवल्याचे म्हटले आहे. तसेच कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर करून कुस्ती संघटनेच्या प्रमुखाला राजीनामा देण्यास भाग पाडल्याचा आरोपही त्यांनी कुस्तीपटूंवर केला आहे.

याचिका दाखल केल्यानंतर त्यांचे वकील शारिकसंत प्रसाद यांनी सांगितले की, या प्रकरणातील याचिकाकर्ता विकी हा खासदार बृजभूषण शरण सिंह यांचे अधिकृत निवासस्थान अशोक रोड येथे 21 येथे राहतो आणि त्यांचा स्वयंपाक घरात काम करतो.

आंदोलक कुस्तीपटूंनी महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ झाल्याचे गंभीर आरोप जाहीरपणे करून बृजभूषण यांच्या प्रतिष्ठेला आणि सन्मानाला धक्का पोहचवला असा आरोपही या याचिकेत करण्यात आला आहे. अलीकडेच साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्यासह अनेक बड्या कुस्तीपटूंनी दिल्लीच्या जंतरमंतरवर रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करत आंदोलन केले.

यानंतर शुक्रवारी उशीरा सरकारने कुस्तीपटूंच्या आंदोलनाची दखल घेत त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. यासह केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिले, ज्यानंतर कुस्तीपटूंनी आपलं आंदोलन मागे घेतलं. यासह या प्रकरणी चौकशी होत नाही तोपर्यंत बृजभूषण सिंह यांनी कुस्ती संघटनेपासून दूर राहण्याचा आदेशही केंद्र सरकारने दिला आहे.


नांदेडमध्ये तरुणाच्या रोजच्या छेडछाडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या; गुन्हा दाखल