घरट्रेंडिंगVideo: माणुसकी सोडलेल्यांनी या माशाकडून प्रेरणा घ्यावी

Video: माणुसकी सोडलेल्यांनी या माशाकडून प्रेरणा घ्यावी

Subscribe

खोल समुद्रात पडलेला मोबाइल एका व्हेल माशाने परत केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही नक्कीच त्या व्हेलच्या प्रेमात पडाल...

आजकाल समाजात वावरत असताना माणसांनी माणुसकी सोडल्याचे दिसते. परंतु माणसांपेक्षा अधिक भावना प्राण्यांमध्ये असल्याची एक घटना नॉर्वेमध्ये घडली. नॉर्वेतील हॅमरफेस्ट हार्बरमध्ये एक ग्रुप समुद्रात फेरफटका मारण्यास गेले होते. त्यापैकी एका महिलेचा फोन अचानक समुद्रात पडला. महागडा फोन असल्याने ती महिला नाराज झाली. हा फोन परत कसा मिळवता येईल या विचाराच ती महिला होती.

परंतु काही वेळाने असे काही घडले की, ज्यामुळे सगळेच अवाक झाले. पाण्यातून एक व्हेल मासा वर येताना बोटीतील काही माणसांना बोटीच्या दिशेने दिसला. त्यावेळी व्हेलच्या तोंडात समुद्रात पडलेला फोन असल्याचेही बोटीतील लोकांना दिसले. हा मासा जवळ आला तसा त्याने तोंडात धरून ठेवलेला मोबाइल बोटीतील त्या महिलेच्या मित्राने काढून घेतला. दरम्यान या सगळ्या घटनेचे संपुर्ण व्हिडिओ शूट देखील करण्यात आले. जे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

- Advertisement -

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, ईसा ओपडाहल ही एक महिला आपल्या मित्रांसोबत समुद्रात फिरत होती. याच वेळी मित्रांशी गप्पा-गोष्टी मारत असताना ईसाचा मोबाइल थेट समुद्रातच पडला. सुरुवातीला काय झाले हे कुणालाच कळले नाही. पण त्यानंतर अवघ्या काही वेळात समुद्रात पडलेला मोबाइल हा चक्क एका व्हेल माशाने परत आणून दिला होता.

- Advertisement -

यावेळी बोटीत बसलेल्या ईसाला तिचा फोन आश्चर्यकारकरित्या परत व्हेलने दिल्याचा प्रसंग पाहून आपण देखील त्या व्हेल माशाच्या नक्कीच प्रेमात पडू यात शंकाच नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -