घरCORONA UPDATEZydus Cadila ने DCGIकडे मागणी केलेल्या मोनोक्लोनल अँटिबॉडीज म्हणजे काय ? जाणून...

Zydus Cadila ने DCGIकडे मागणी केलेल्या मोनोक्लोनल अँटिबॉडीज म्हणजे काय ? जाणून घ्या

Subscribe

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही कोरोनाची लागण झाल्यानंतर मोनोक्लोनल अँटिबॉडीज देण्यात आले होते.

सध्या कोरोनावर मात करण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस हा एकच पर्याय आपल्याकडे आहे. कोरोना विरोधातल्या या लढाईमध्ये आता आणखी एक हत्यार समोर येत आहे ते म्हणजे मोनोक्लोनल अँटिबॉडीज (Monoclonal Antibodies) या मोनोक्लोनल अँटिबॉडीजच्या मानवी चाचणीसाठी परवानगी मिळावी यासाठी झायडस कॅडिला (Zydus Cadila) ने ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (DCGI) मागणी केली आहे. सध्या अमेरिका आणि युरोपमध्ये या मोनोक्लोनल अँटिबॉडीजचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही कोरोनाची लागण झाल्यानंतर मोनोक्लोनल अँटिबॉडीज देण्यात आले होते. भारतातही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणत वाढत आहे. भारतातही मोनोक्लोनल अँटिबॉडीजच्या वापरासाठी परवानगी मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. पण मोनोक्लोनल अँटिबॉडीज म्हणजे नक्की आहे तरी काय? ते किती प्रभावी आहे? जाणून घ्या. (What are the monoclonal antibodies demanded by Zydus Cadila to DCGI?)

मोनोक्लोनल अँटिबॉडीज म्हणजे नक्की काय?

मोनोक्लोनल अँटिबॉडीज म्हणजे एक प्रकारचे कॉकटेल ड्रग्ज आहे. casirivimab आणि Imdevimab या दोन औषधांचा यात वापर करण्यात आला आहे. मोनोक्लोनल अँटिबॉडीज घेतल्यामुळे कोरोनाची लागण होण्याचा धोका अत्यंत कमी असतो असे म्हटले गेले आहे. मोनोक्लोनल अँटिबॉडीजमुळे कोरोनाच्या विषाणूला आवश्यक ते खाद्य मिळत नाही त्यामुळे तो शरीरात पसरत नाही,असे सांगण्यात आले आहे. भारतात सिप्ला आणि स्वत्झरलॅन्डची कंपनी रॉश मिळून मोनोक्लोनल अँटिबॉडीजची निर्मिती करत आहेत.

- Advertisement -

मोनोक्लोनल अँटिबॉडीज किती प्रभावी आहे?

रुग्णामध्ये कोरोनाचे निदान झाल्यानंतर तीन दिवसांच्या आत रुग्णाला मोनोक्लोनल अँटिबॉडीज दिल्यास ते जास्त प्रभावी ठरते,असे सांगण्यात येते. मोनोक्लोनल अँटिबॉडीज घेतल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात दाखल व्हावे लागत नाही. मोनोक्लोनल अँटिबॉडीज म्हणजे एक प्रकारचे इम्युनिटी बुस्टर आहे. मोनोक्लोनल अँटिबॉडीज हे कोरोना विरोधात लढण्यासाठी एक प्रभावशाली हत्यार असल्याचे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.


हेही वाचा – Lancet च्या मोदी सरकारला सूचना, कोरोना नियंत्रणासाठी सुचवला ८ सूत्री कार्यक्रम

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -