घरदेश-विदेशParliament : Article 370 हटवल्यानंतर काय केले? अमित शहांनी आकडेच वाचून दाखवले

Parliament : Article 370 हटवल्यानंतर काय केले? अमित शहांनी आकडेच वाचून दाखवले

Subscribe

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, काही लोकांनी काश्मीरला कमी लेखण्याचा प्रयत्न केला. काहींनी म्हटले फक्त नाव बदलत आहोत.

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून, आज तिसऱ्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभा सभागृहात जम्मू आणि काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक 2023 आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना विधेयक 2023 सभागृहात मांडले. यावेळी विरोधकांनी जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर तेथे काय केले? असा प्रश्न विचारताच अमित शहांनी तेथे केलेल्या विविध सुधारणांची आकडेवारीच सभागृहात मांडली. (What did Parliament do after Article 370 was deleted? Amit Shah read out the figures)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, काही लोकांनी काश्मीरला कमी लेखण्याचा प्रयत्न केला. काहींनी म्हटले फक्त नाव बदलत आहोत. मी त्या सगळ्यांना सांगतो की, नावासोबत एक सन्मान जोडल्या गेलेला असतो. याला फक्त तेच लोक समजू शकतात की जे राजकीय फायद्यासाठी याचा वापर करत नाहीत. नरेंद्र मोदी हे अशा गोष्टींचा फायदा राजकारणासाठी करून घेत नाहीत असेसुद्धा अमित शहा यांनी यावेळी स्पष्ट केले.

- Advertisement -

काश्मिरी पंडितांना घरे सोडावे लागणार नाहीत

विधेयकावर बोलताना अमित शहा म्हणाले की, मागील 70 वर्षांपासून दुर्लक्षित आणि अपमानित झालेल्या पीडितांना न्याय देण्यासाठी जम्मू-काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयक आणले आहे. देशभरात सुमारे 46 हजार 631 कुटुंबे आणि 1लाख 57 हजार 967 लोकांना जम्मू आणि काश्मीरमधून स्थलांतर करण्यास भाग पाडले गेले. त्यांना न्याय देण्यासाठी सरकारने एक विधेयक आणले आहे. व्होटबँकेचा विचार न करता सुरुवातीलाच दहशतवादाचा सामना केला असता तर काश्मिरी पंडितांना खोरे सोडावे लागले नसते अशा शब्दांत अमित शहांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

हेही वाचा : PARLIAMENT : काश्मिरी पीडितांना न्याय देण्यासाठी J&K RESERVATION विधेयक; शहां विरोधकांवर बरसले

- Advertisement -

विधानसभेच्या जागा राखीव ठेवण्याचा प्रस्ताव

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, जम्मू-काश्मीरच्या दोन विधेयकांपैकी एका विधेयकात एका महिलेसह काश्मिरी विस्थापित समुदायाच्या दोन सदस्यांना विधानसभेत नामनिर्देशित करण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय पाकव्याप्त काश्मीरमधून (पीओके) विस्थापित लोकांसाठी एक जागा राखीव असणार असल्याचेही विधेयकात समावेश असल्याची माहिती त्यांनी यावेळी सभागृहात दिली.

राहुल गांधीवर थेट हल्ला

विधेयकावर बोलताना अमित शहा यांनी दहशतवादावरही भाष्य केलं. 1980 नंतर दहशतवादाचे युग आले आणि ते अतिशय भयावह दृश्य होते. या भूमीत राहणाऱ्या लोकांना आपला देश मानून हाकलून लावले गेले आणि त्यांची कोणीही पर्वा केली नाही. ते थांबवण्याची जबाबदारी असलेले लोक इंग्लंडमध्ये सुट्टीचा आनंद लुटत होते. काश्मिरी पंडित विस्थापित झाले तेव्हा त्यांना त्यांच्याच देशात निर्वासित म्हणून जगण्यास भाग पाडले गेले अशा शब्दांत अमित शहा यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

हेही वाचा : MP Election : पाच खासदारांचे राजीनामे; भाजपकडून ‘मामांना’ ‘मा.मु.’ बनविण्याची तयारी?

अशी झाले कुटुंब विस्थापित

शाह म्हणाले की, पाकिस्तानने 1947 मध्ये काश्मीरवर आक्रमण केले आणि सुमारे 31,789 कुटुंबे विस्थापित झाली. 1965 आणि 1971 च्या युद्धात 10,065 कुटुंबे विस्थापित झाली. 1947, 1965 आणि 1969 या तीन युद्धांमध्ये एकूण 41,844 कुटुंबे विस्थापित झाली. हे विधेयक त्या लोकांना हक्क देण्याचा, त्या लोकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न आहे. कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये काय साध्य झाले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शाह म्हणाले की, पूर्वी लोक म्हणायचे की, कलम 370 रद्द केले तर तिथे रक्ताच्या नद्या वाहतील, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने त्यातील तरतुदी रद्द केल्या आता तेथे शांतता नांदत असल्याचे शहा यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -