Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर राजकारण गुजरात निवडणूक गुजरात आणि हिमाचलमधील 2017च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल काय सांगतात? वाचा सविस्तर

गुजरात आणि हिमाचलमधील 2017च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल काय सांगतात? वाचा सविस्तर

Subscribe

गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण आज या दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी पार पडणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण आज या दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी पार पडणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्याकडे लक्ष लागले आहे. मात्र याआधी 2017मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये काय घडलं कोणाला किती जागा मिळाल्या होत्या? कोणत्या पक्षाचे वर्चस्व होते हे जाणून घेऊयात…

गुजरात विधानसभा निवडणूक 2017

2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने गुजरातमध्ये विजय मिळवला होता. त्यावेळी सहाव्यांदा भाजपाने विधानसभा निवडणूक जिंकली होती आणि सत्ता आपल्याकडे कायम ठेवली होती. 2017 च्या निवडणुकीत गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणुका झाल्या. या निवडणुकीत भाजपने 99 जागा जिंकल्या होत्या. तर या निवडणुकीत काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. तर इतर पक्षांना 6 जागांवर समाधान मानावे लागले होते.

- Advertisement -

या निवडणुकीत भाजपाला 49.05 टक्के मते मिळाली होती. तर काँग्रेसला 41.44 टक्के मते मिळाली होती. 2017मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतदानावेळी यंदाच्या तुलनेत चार टक्क्यांनी अधिक मतदान झाले होते. मात्र यंदा केवळ 64.33 टक्के मतदान झाले आहे. 2017 मध्ये गुजरातमध्ये मतदानाची टक्केवारी ही 68.39 टक्के होती.

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2017

हिमाचल प्रदेशमध्ये 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा विजयी झाला होता. हिमाचलमध्ये भाजपने 44 जागा जिंकल्या असून, काँग्रेसला 21 जागा मिळाल्या होत्या. तीन जागा इतर पक्षांनी जिंकल्या होत्या. या निवडणुकीत भाजपाने एकहाती सत्ता मिळवली होती.

- Advertisement -

हिमाचल प्रदेशमध्ये यावेळी मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. आतापर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकीतील मतदानाचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. 76 टक्के मतदान झाले होते. यापूर्वी 2017 च्या मागील विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 75.57 टक्के मतदान झाले होते.


हेही वाचा – हिमाचल आणि गुजरातमधील निवडणुकांचा निकाल आज लागणार, भाजपा सत्ता कायम ठेवणार का?

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -