घरताज्या घडामोडीRussia Ukraine War: अमेरिकेने रशियावर लावलेल्या निर्बंधांमुळे भारतीय एअरफोर्सवर होणार परिणाम?

Russia Ukraine War: अमेरिकेने रशियावर लावलेल्या निर्बंधांमुळे भारतीय एअरफोर्सवर होणार परिणाम?

Subscribe

युक्रेनवर हल्ल्या केल्यामुळे अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध लावले आहेत. याबाबत व्हाईस चीफ मार्शल संदीप सिंह म्हणाले की, यामुळे भारत आणि रशियाच्या संबंधांवर कोणताही फरक पडणार नाही. कारण दोन्ही देश आपापल्या जागी मजबूत आहे. रशियासोबत आमचे संबंध पूर्वीप्रमाणे मजबूत करू. सिंह एका पत्रकार परिषदेत बोलले.

रशियाने युक्रेनवर २४ फेब्रुवारीपासून हल्ला करण्यास सुरुवात केली होती. आता रशिया आणि युक्रेन युद्ध शिगेला पोहोचले आहे. दरम्यान अमेरिकेने रशियावर अनेक प्रकारे आर्थिक निर्बंध लावले आहेत. याशिवाय युरोपीय युनियन आणि अमेरिकेने रशियाच्या मोठ्या नेत्यांचे परराष्ट्र संपत्ती जप्त करण्यास सुरुवात केली आहे. भारतही आपल्या नागरिक आणि विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढत आहे. तसेच भारताने युक्रेनला मानवतावादी मदत म्हणून औषधे आणि इतर साहित्याची पहिली खेप पोलंडमार्गे पाठवली आहे.

- Advertisement -

यूएनएससीमध्ये भारताने आपली तटस्थ भूमिका मांडली आहे. भारत सतत चर्चेने मार्ग निघेल अशी भूमिका मांडत आहे. संयुक्त राष्ट्र महासभेते युक्रेन संकटाबाबत जेव्हा मतदान प्रक्रिया सुरू केली त्यावेळी १५ पैकी ११ देशांनी युक्रेनच्या समर्थनार्थ मतदान केले. तर भारत आणि चीनने मतदानात भाग घेतला नाही. तसेच रशियाने या प्रस्तावाविरोधात मतदान केले होते.

युक्रेन सतत बोलत आहे की, भारताने यात हस्तक्षेप केला पाहिजे आणि रशियाला हल्ला रोखण्यासाठी सांगितले पाहिजे. पण भारताने थेट रशियाला कोणतीही विनंती केली नाहीये. परंतु युद्ध आणि हिंसेला विरोध केला आहे. तर चीन रशियासोबत दाराआड उभा असल्याचे दिसत आहे. रशियाने केलेल्या युक्रेनमधील हल्ल्याला कधी चीन चूकीचे असल्याचा म्हणाला नाही.

- Advertisement -

हेही वाचा – युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी पोलंडच्या भारतीय दूतावासाची नवी अॅडव्हायजरी; सांगितला बाहेर पडण्याचा मार्ग


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -