Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांना नेमकं झालं तरी काय?

उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांना नेमकं झालं तरी काय?

Subscribe

किम जोंग उन १५ एप्रिल रोजी आजोबा आणि उत्तर कोरियाचे संस्थापक किम इल सुंग यांच्या वाढदिवशी झालेल्या भव्य सोहळ्याला उपस्थित नव्हते. इतक्या मोठ्या कार्यक्रमात हजेरी न लावल्यामुळे किम जोंग यांच्या तब्येतीबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

उत्तर कोरियाचा शासक किम जोंग यांच्या तब्येतेची माहिती रहस्यमय बनली आहे. मंगळवारी अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या माध्यमांनी किम जोंग यांची प्रकृती खराब नसल्याबद्दल बरेच दावे केले आहेत. तथापि, कित्येक तास उलटून गेले तरी उत्तर कोरियाकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार किम जोंग यांना हृदय रोगाचा त्रास होता आणि अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. दरम्यान, त्यांची तब्येत अधिकच खालावली. दक्षिण कोरिया आणि अमेरिकन माध्यमांनी रिपोर्ट्समध्ये याबद्दल दोन प्रकारचे दावे केले आहेत. अमेरिकन गुप्तचर स्रोतांचा हवाला देत माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, “किम जोंग एकतर कोमामध्ये आहेत किंवा त्यांचा मृत्यू झाला आहे.” त्याचवेळी दक्षिण कोरियाच्या गुप्तचर स्रोतांचा हवाला देत माध्यमांनी, “किम जोंग यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया चालू होती. या क्षणी कोणालाही त्यांच्या प्रकृतीची माहिती नाही,” अशी माहिती दिली. तथापि, दक्षिण कोरियाचे सरकार आणि चीनच्या गुप्तचर यंत्रणेच्या सूत्रांनी बुधवारी या केवळ अफवा असल्याचं सांगितलं.

दरम्यान, किम जोंग यांच्या प्रकृतीविषयी अफवांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही मंगळवारी व्हाईट हाऊसमधील पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की मला आशा आहे की किम ठीक आहेत. ट्रम्प म्हणाले, “किम जोंग यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत आणि मी त्यांना चांगलं काम करताना पाहू इच्छित आहे. त्यांची तब्येत कशी आहे हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. सध्या आमच्याकडे अशा अहवालाविषयी कोणतीही माहिती नाही.”


- Advertisement -

हेही वाचा – कोरोना इफेक्ट: स्विगीच्या मागणीत ६० टक्क्यांनी घट, १००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढणार


दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपती भवनात (ब्लू हाऊस) रॉयटर्सचा हवाला देत म्हणाले की, उत्तर कोरियाकडून ३६ वर्षीय किम जोंग यांच्या प्रकृतीसंदर्भात कोणतीही माहिती आलेली नाही. अशा परिस्थितीत किम जोंगच्या प्रकृतीबाबतचा अंदाज लावणं योग्य नाही. त्याचप्रमाणे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या आंतरराष्ट्रीय संपर्क विभागाच्या अधिकाऱ्यानेही किम जोंगची प्रकृती खराब आहे, अशा अफवांवर विश्वास ठेवणे योग्य ठरणार नाही, असं म्हटलं.

- Advertisement -

तथापि, किम जोंग यांना शेवटचं १२ एप्रिल रोजी दिसले होते. इतकेच नाही तर १५ एप्रिल रोजी आजोबा आणि उत्तर कोरियाचे संस्थापक किम इल सुंग यांच्या वाढदिवशी झालेल्या या भव्य सोहळ्यातही ते दिसले नाहीत. हा दिवस संपूर्ण उत्तर कोरियामध्ये साजरा केला जातो आणि तेथील लोकांना सार्वजनिक सुट्टीही असते. इतक्या मोठ्या कार्यक्रमात हजेरी न लावल्यामुळे किम जोंग यांच्या तब्येतीबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.


हेही वाचा – Coronavirus: वुहानच्या दोन डॉक्टरांचा रंग बदलला, संसर्ग झाल्यानंतर चेहरा झाला काळा


 

- Advertisment -