Corona आणि Influenza दोन्हीचे संक्रमण एकदाच झाले तर काय होईल ? वाचा ‘WHO’चे उत्तर

गेल्या दोन वर्षापासून जगभरात कोरोनाचे थैमान सुरु आहे. त्यातच आता कोरोनाचे नवे व्हेरिएंट डोके वर काढत आहेत. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ने डेल्टाक्रॉनबाबत काही गोष्टी सांगितल्या आहेत. WHO च्या माहीतीनुसार, डेल्टाक्रॉन म्हणजेच जे रुग्ण डेल्टा व्हेरिएंटने संक्रमित झाले आहेत आणि त्या रुग्णांना ओमिक्रॉनचे संक्रमण झाले आहे.

What happens if both Corona and Influenza infections occur at the same time? Read the answer to 'WHO'

गेल्या दोन वर्षापासून जगभरात कोरोनाचे थैमान सुरु आहे. त्यातच आता कोरोनाचे नवे व्हेरिएंट डोके वर काढत आहेत. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ने डेल्टाक्रॉनबाबत काही गोष्टी सांगितल्या आहेत. WHO च्या माहीतीनुसार, डेल्टाक्रॉन म्हणजेच जे रुग्ण डेल्टा व्हेरिएंटने संक्रमित झाले आहेत आणि त्या रुग्णांना ओमिक्रॉनचे संक्रमणही झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन समोर आल्यानंतर, हा शब्दप्रयोग प्रथम सायप्रस आधारित संशोधक लिओजिओस कोस्ट्रिकस यांनी वापरला होता. सध्या देशात डेल्टाक्रॉनचे २५ रुग्ण आढळून आले आहेत.

कोविड – 19 च्या डब्लूएचओच्या तांत्रिक प्रमुख डॉ.मारिया व्हॅन केरखोव यांनी सांगितले की, डेल्टाक्रॉन हे व्हायरसच्या सिक्वेसिंग प्रक्रियेदरम्यान होणाऱ्या कंटेमिनेशनचा परिणाम आहे. तथापि अद्यापही हे स्पष्ट झाले नाही की, SARS-CoV-2 च्या व्हेरिएंटचे व्यक्ती संक्रमित होतात की नाही. याशिवाय केरखाव यांनी सांगितले की, नुकतंच एका व्यक्तीला इन्फ्लूएंझा आणि कोविड-19 या दोन्ही व्हायरसचे संक्रमण झाले होते. याशिवाय एका सर्वेक्षणानुसार, ज्याप्रमाणे वेळ पुढे निघून जात आहे त्याप्रमाणे या कोरोना व्हेरिएंटकडे लक्ष देणे गरजेचे असणार आहे. कारण हे व्हेरिएंट केव्हा त्यांचा प्रसार सुरु होईल ते म्हणाले की, ज्याप्रकारे फ्लू पसरत आहे, त्याप्रमाणे जगात इन्फ्लूएंझाच्या संख्येतही वाढ होण्याची शक्यता आहे.

कोविड-19 किंवा इन्फ्लूएन्झा ची लागण होऊ नये म्हणून, यासाठी कोणतेही जोखीमीचे काम करु नये. याशिवाय लागण झालेल्या रुग्णांनी लस घेणे अनिवार्य आहे. WHO चे तांत्रिक नेतृत्व या दोघांचा संपर्क कमी करण्याची शिफारस करते आणि फ्लूची लस घेण्यास पात्र असलेल्या लोकांना लसीकरण करणे आवश्यक आहे.


हेही वाचा – आरोग्य मंत्र्यांना कमी लेखता का?, पंतप्रधानांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन राऊतांचा भाजपला सवाल