घरदेश-विदेशभारतात तुर्कीसारखा भूकंप झाला तर? देशातील 'या' राज्यांना सर्वाधिक धोका

भारतात तुर्कीसारखा भूकंप झाला तर? देशातील ‘या’ राज्यांना सर्वाधिक धोका

Subscribe

Most Dangerous states for earthquake in India | इंडियन टेक्टोनिक प्लेट आणि तिब्बतन प्लेट एकमेकांवर आदळतात. यामुळे प्रेशर निर्माण होऊन भूकंप होतो. भारतीय मानक ब्युरोने देशातील भूकंपासाठी पाच वेगवेगळे झोन तयार केले आहेत. पाचवा झोन सर्वांत धोकादायक झोन आहे.

तुर्कीमध्ये भूकंपामुळे (Turkey earthquake) आतापर्यंत ३४०० हून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. तर, आठ हजारांहून अधिक लोकांना वाचवण्यात यश मिळालं आहे. गेल्या दोन दिवसांत तुर्कीमध्ये ५५० पेक्षा जास्तवेळा भूकंपाचे हादरे बसले. भारतात दरवर्षी कमीत कमी १००० वेळा तरी भूकंप होतो. याची तीव्रता कधी कमी असते तर कधी जास्त असते. वर्षभरात दोनशे-अडीचशेवेळा तरी जमीन हलल्याचा भास होतो. आपल्या देशातील जवळपास ५९ टक्के जमिनीचा हिस्सा भूकंपासाठी डेंजरझोन ठरलेल्या भागांत आहे. यामध्ये सर्वाधिक धोका हिमालयातील भागांना आहे. या ठिकाणी असे काही भूकंप झाले आहेत ज्याची तीव्रता उच्च होती. (Most Dangerous states for earthquake in India)

हेही वाचा तुर्कस्तान-सीरिया भूकंप: ढिगाऱ्याखाली दबलेल्या आईने मृत्यूपूर्वी दिला मुलाला जन्म, व्हिडीओ व्हायरल

- Advertisement -

१८९७ मध्ये शिलॉन्ग पठारावर ८.१ रिश्टर स्केलवर भूकंप झाला होता. तर, १९०५ मध्ये कांगडा येथे झालेल्या भूकंपाची तीव्रता ७.८ रिश्टल स्केलवर होती. १९३४ मध्ये बिहार-नेपाळ सीमेवर ८.३ रिश्टल स्केलवर भूकंपाचे धक्के जाणवले होते. अरुणाचल प्रदेश-चीन सीमेवर १९५० मध्ये ८.५ रिश्टर स्केलएवढी भूकंपाची तीव्रता मोजण्यात आली होती. २०१५ मध्ये ७.९ तीव्रतेचा भूकंप नेपाळमध्ये झाला होता. या भागांमध्ये मध्यम ते धोकादायक स्तरावर भूकंप होत असतात. कारण या भागात जवळपास दोन महाद्विपांचे टेक्टोनिक प्लेट मिळतात.

इंडियन टेक्टोनिक प्लेट आणि तिब्बतन प्लेट एकमेकांवर आदळतात. यामुळे प्रेशर निर्माण होऊन भूकंप होतो. भारतीय मानक ब्युरोने देशातील भूकंपासाठी पाच वेगवेगळे झोन तयार केले आहेत. पाचवा झोन सर्वांत धोकादायक झोन आहे.

- Advertisement -

Earthquake Zone 1 : झोन एक धोकादायक क्षेत्राच्या बाहेर आहे. या क्षेत्रातील शहरांना/राज्यांना भूकंपाचा धोका नसतो.

Earthquake Zone 2 : झोन २ मध्ये राजस्थान, हरियाणा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, ओदिसा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तमिळनाडू या राज्यांचा काही भाग येतो. देशाची जवळपास ३० टक्के जागा झोन २ ने व्यापली आहे.

Earthquake Zone 3 : या झोनमध्ये केरळ, गोवा, लक्षद्विप समूह, उत्तर प्रदेश आणि हरियाणाचा काही भाग येतो, तर गुजरात आणि पंजाबचा भाग, पश्चिम बंगालमधील काही भाग, पश्चिमी राजस्थान, मध्यप्रदेश, बिहारमधील लहान भाग, झारखंडचा उत्तर विभाग, छत्तीसगढमधील काही गावे, महाराष्ट्र, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगना, तमिळनाडू आणि कर्नाटकचा काही भाग येतात. देशाची जवळपास ३० टक्के जागा झोन २ ने व्यापली आहे.

हेही वाचा – Turkey Earthquake: तुर्कीतील भूकंपाबद्दल सर्वात आधी पक्ष्यांना चाहूल? हा VIRAL VIDEO एकदा पाहा

Earthquake Zone 4: जम्मू आणि काश्मीरचा भाग, लडाख, हिमाचल आणि उत्तराखंडचा काही भाग, हरियाणा, पंजाब, दिल्ली, सिक्किम, उत्तर प्रदेशचा उत्तर भाग, बिहार आणि पश्चीम बंगालचा लहान भाग, गुजरात, पश्चीम तटाचा भाग तर महाराष्ट्रचा काही भाग आणि पश्चीम राजस्थानचाही काही भाग या झोनमध्ये येतो. देशातील जवळपास १८ टक्के भाग झोन चारने व्यापला आहे.

Earthquake Zone 5: या झोनमध्ये जम्मू आणि काश्मीरचा भाग म्हणजेच काश्मीरचं खोरं येतं. तर, हिमाचल प्रदेशचा पश्चिमी भाग, उत्तराखंडचा पूर्व विभाग, गुजरातमधील कच्छ, बिहारचा उत्तर भाग, भारताचे सर्व पूर्वोत्तर राज्य, अंदमान आणि निकोबर द्विपसमूह या झोनमध्ये येतात. देशातील जवळपास ११ टक्के भाग झोन पाचने व्यापला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -