घरCORONA UPDATEहायड्रॉक्सीक्लोरोक्विन म्हणजे काय आणि जगभरात मोठ्या प्रमाणात मागणी का आहे?

हायड्रॉक्सीक्लोरोक्विन म्हणजे काय आणि जगभरात मोठ्या प्रमाणात मागणी का आहे?

Subscribe

हायड्रॉक्सीक्लोरोक्विन कोरोनाच्या उपचारात हे औषध प्रभावी मानले जात आहे. सध्या या औषधाची जोरदार चर्चा सुरु आहे.

मलेरियाच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची आजकाल खूप चर्चा आहे. कारण, कोरोनाच्या उपचारात देखील हे औषध प्रभावी मानले जात आहे. तथापि, अद्याप कोणतेही पुरावे नाहीत की हे औषध कोरोना विषाणूच्या संसर्गास प्रतिबंध करू शकतं किंवा रोगावर उपचार करू शकतं. मात्र, अमेरिकेमध्ये कोरोनाग्रस्तांवर या औषधाचा उपयोग केला जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार भारताकडून केवळ हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच मागितलं नाही, तर औषध देत नसल्यास सूडबुद्धीचा इशारा देखील दिला. तथापि, भारतानेही प्रथम या औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली आणि नंतर मानवतेच्या कारणास्तव निर्यातीवरील बंदी उठवली.

हायड्रॉक्सीक्लोरोक्विन म्हणजे काय?

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे दशकांपासून मलेरियावर उपचार म्हणून वापरलं जात आहे. हे संधिवात आणि त्वचाक्षय (Lupus) सारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी देखील वापरलं जातं.

- Advertisement -

hydroxychloroquine tablet

कोरोनावर संभाव्य उपचार का मानलं गेलं?

प्रयोगशाळेत केलेल्या संशोधनात असं दिसून आलं आहे की, क्लोरोक्वीन कोरोना विषाणूला पेशींवर हल्ला करण्यापासून रोखतं. मात्र, हायड्रॉक्सीक्लोरोक्विन इन्फ्लूएन्झा आणि इतर विषाणूजन्य रोग रोखण्यासाठी सक्षम नसल्याचं आढळून आलं आहे. परंतु चीन आणि फ्रान्समधील डॉक्टरांच्या अहवालानुसार, कधीकधी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन अँटीबायोटिक अ‍ॅझिथ्रोमाइसिन सोबत दिल्यावर रुग्ण बरे होतात. परंतु हा अभ्यास अल्प प्रमाणात केला गेला आहे. म्हणून हे औषध कार्य करतं की नाही हे विस्तृत स्तरावर अद्याप अस्पष्ट आहे.

- Advertisement -

व्यापक संशोधनाची आवश्यकता

चीनकडून नुकत्याच झालेल्या संशोधनात असं सांगितलं आहे की, हायड्रोक्सीक्लोरोक्विन कोरोनाच्या गंभीर नसलेल्या रूग्णांवर उपचार करण्यास मदत करू शकेल. परंतु हे संशोधन मर्यादित प्रमाणात करण्यात आलं, ज्यामध्ये केवळ ६२ रुग्ण होते आणि त्यांना इतर औषधंही दिली गेली. दरम्यान, या संदर्भात अधिक संशोधनाची आवश्यकता आहे, असं स्वत: या संशोधकांनी म्हटलं आहे. कोरोना रूग्णांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती बरीच सक्रिय होते, ज्यामुळे जळजळ / चिडचिड तसेच फुफ्फुस व इतर अवयवांचना नुकसान होण्याची शक्यता असते. तर हायड्रॉक्सीक्लोरोक्विनला रोगप्रतिकारक शक्तीवर मात करण्यासाठी ओळखला जातं. परंतु हे खरोखर कार्य करतं का?, याची पुष्टी केलेला कोणताही पुरावा नाही.

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन संक्रमणापासून संरक्षण करू शकतं?

हायड्रॉक्सीक्लोरोक्विन कोरोना विषाणूच्या संसर्गापासून संरक्षण करू शकतो असा कोणताही पुरावा नाही. तथापि, मिनेसोटा विद्यापीठातील संशोधक संसर्गापासून त्यांचे संरक्षण करू शकतं की नाही हे पाहण्यासाठी कोरोना रूग्णांसमवेत राहणा-या लोकांवर औषधाच्या परिणामाची चाचणी घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

हे औषध एफडीएने मंजूर केलं आहे?

अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मलेरिया, संधिवात आणि त्वचाक्षयवरील (Lupus) उपचारांसाठी या औषधास मान्यता दिली आहे, मात्र, कोविड-१९ साठी अद्याप मान्यता दिलेली नाही. परंतु डॉक्टरांना हे औषध उपयुक्त ठरत आहे, असं वाटत असल्यास त्यांना या औषधाचा वापर करण्याची परवानगी आहे.

कोरोना रूग्णांना हायड्रॉक्सीक्लोरोक्विन दिलं जात आहे का?

अद्याप कोरोनावर कोणतेही प्रमाणित उपचार आलेले नाहीत. बरीच रुग्णालये रुग्ण बर होतील या आशेने रूग्णांना हे औषध देण्यास सुरूवात केली आहे. जगभरात या औषधाच्या क्लिनिकल चाचण्या सुरू झाल्या आहेत. अमेरिकेत २ एप्रिल रोजी चाचणी सुरू करण्यात आली, यासाठी ४४ वैद्यकीय केंद्रांवर ५१० रुग्णांची नोंद झाली आहे. हे औषध कोरोना विषाणूंविरूद्ध कार्य करते की नाही हे अभ्यासातून दिसून येईल.

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन घेण्याचा धोका आहे का?

सर्व औषधांप्रमाणेच त्याचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात. हृदय, रेटिनासंबंधित डोळ्याच्या समस्या, यकृत आणि मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त लोकांसाठी हे सुरक्षित नाही. याशिवाय मळमळ, अतिसार, मनःस्थितीत बदल आणि त्वचेवर पुरळ यासारखे दुष्परिणाम देखील होऊ शकतात. हृदयरोगतज्ज्ञ चेतावणी दिली आहे की, हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आणि एझिथ्रोमाइसिन हृदयाच्या कार्यामध्ये धोकादायक ठरु शकतं. आजार नसलेल्या लोकांसाठी ते तुलनेने सुरक्षित आहे. परंतु कोविड -१९च्या गंभीर आजारासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन सुरक्षित आहे की नाही हे माहित नाही.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन घेऊ शकता?

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन डॉक्टरांना विचारल्याशिवाय अजिबात घेऊ शकत नाही. ज्यांना आपल्याला कोणते आजार आहेत हे माहित आहे अशा लोकांनी कोणती औषध घेत आहात हे डॉक्टरांना सांगा.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -